रक्तवहस्त्रोतस् - युवान पिडका
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
शाल्मलीकण्टकप्रख्या: कफमारुतरक्तजा: ।
युवानपिडका यूनां विज्ञेया मुखदूषिका: ॥
मा. नि. क्षुद्ररोग - ३३ पान ३७१
शाल्मलीकण्टकारा: पिटिका: सरुजो घना: ।
मेदोगर्भा मुखे यूनां ताभ्यां च मुखदूषिका: ॥
वा. उ. ३१-५ पान ८८८
तरुण वयामध्यें कफ, वात, रक्त व मेद यांच्या दुष्टीमुळें सावरीच्या काटयासारखे फोड तोंडावर येतात. त्यांना तारुण्यांत उत्पन्न होणार्या पिडका म्हणून युवानपिडका व मुखाला दूषित, विरुप करणार्या म्हणून मुखदूषिका असें नांव आहे. हा विकार १६ ते २५ या वयामध्यें विशेषे करुन आढळतो. पुढें पुढें तो आपोआप कमी कमी होत जातो. नाक, गाल, कपाळ, या ठिकाणीं विशेषत: हे फोड उत्पन्न होतात. पाक झाल्यानंतर पीडन केलें असतां त्यांतून पूयासह श्वेतवर्ण, टणक असें एक बीज निघतें व तें निघाल्यानंतर हे फोड दबून बरे होतात. यांची उत्पत्ति मधुनमधून सतत होत असते. कांहीं व्यक्तींच्यामध्यें हे फोड बरेच मोठे लहान लहान गलवांसारखे व अत्यंत पीडाकर होतात. फुटल्यानंतर क्वचित् त्यांचे वणही मुखावर रहातात.
चिकित्सा -
व्यंग चिकित्सेंत सांगितलेल्या द्रव्यांचा लेप करावा. अनुलोमन व कफघ्न चिकित्सा करावी. फोड बळेंच फोडूं नयेत. शंखभस्म व हरीतकी हीं द्रव्यें उपयुक्त होतात.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP