रक्तवहस्त्रोतस् - अरुंषिका
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
अरुंषि बहुवक्त्राणि बहुल्लेदीनि मूर्घ्नि तु ।
कफ़ासृक्क्रिमिकोपेन नृणां विद्यादरुंषिकाम्
अरुंषिकामाह - अरुंषीत्यादिना । अरुंषीति व्रणा:
मा. नि. क्षुद्ररोग ३१ म. टीकेसह.
कृमीमुळें प्रकुपित झालेला कफ़ रक्तास दुष्ट करुन डोक्यावर पुष्कळ स्त्राव असलेले व पुष्कळ तोंडें असलेले (व्रणयुक्त) उत्सेध उत्पन्न करतो त्यांस अरुंषिका असें म्हणतात. यांसच खवडे असें नांव आहे.
या व्याधीमध्यें कंडू, दाह, शूल, ज्वर, हीं लक्षणें असतात.
या व्याधीचा परिणाम म्हणून डोक्यावर वण दिसतात व त्या ठिकाणीं बहुधा केस येत नाहींत.
हा व्याधी नवीन असल्यास सुखसाध्य असतो. बरेच दिवस झाले असल्यास या डोक्याचा अधिक भाग रोगानें व्यापला असल्यास कष्टसाध्य होतो. उपेक्षेनें त्यामध्यें कृमी पडतात.
चिकित्सा
-निंब, घमासा, हरताळमिश्रण, टंकणमिश्रण, गंघकरसायन, सूक्ष्म त्रिफ़ळा, सारवाद्यसिव, मंजिष्ठादि काढा, आरोग्यवर्धिनी.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP