विवाह समारंभाच्या धार्मिक विधीसाठी आवश्यक साहित्याची तयारी खालीलप्रमाणे.
आपल्या गुरुजींच्या सल्ल्यानुसार व स्वतःच्या आर्थिक कुवतीनुसार त्यात फेरबदल करावेत.
आवश्यक सर्वसामान्य साहित्य
१. हळदकुंकू
२. गंध
३. अक्षता
४. फुले
५. दूर्वा
६. दर्भ
७. उदबत्त्या
८. दीप
९. साखर
१०. कापूर
११. विड्याची पाने
१२. अखंड सुपार्या
१३. नारळ
१४. गुलाल, रांगोळी
१५. पल्लव
१६. गहू किंवा तांदूळ
१७. पाट
१८. कलश
१९. ताम्हण
२०. पळ्या
२१. पंचपाळी
२२. मंगळसूत्र
२३. वधू व वर यांना द्यावयाचे कपडे
२४. वधूच्या भावास द्यावयाची भेटवस्तू
२५. दोन मोठे हार
२६. फुलांचे गुच्छ
२७. लाह्या
२८. तुपाची वाटी
२९. दारावर लावण्यासाठी तोरण आणि गणपतीचे चित्र.
वाङनिश्चय
१. हळकुंडे
२. कलश
३. साडीचोळी (मुलीस देण्यासाठी)
४. दागिना (सोन्याचा पदर, अथवा लॉकेट, मुलीस घालण्यासाठी)
५. पाने व सुपार्या
६. पूजासाहित्य
७. आप्त इष्ट
८. औक्षणाची तयारी.
वरप्रस्थान
१. नवा धोतरजोडा
२. फुलांच्या माळा
३. घोडा, पालखी किंवा गाडी
४. मुंडावळ
५. पोषाख
६. आप्तइष्ट
७. पांढरे छत्र.
मधुपर्क
१. मध (लहान वाटी)
२. दही
३. कास्यपात्र (काशाचे भांडे)
४. विष्टर (दर्भाची दोरी)
५. जानवी (२)
६. शेला
७. अंगठी
८. अक्षता (कुंकू लावून)
९. तांब्याताम्हन, पळीपंचपात्री
१०. पाय धुण्यास पाणी,
११. पाय पुसण्यास रुमाल
१२. गंध
१३. पुष्प-फुले
१४. सुपार्या.
गौरीहर
१. वधूवस्त्र (अष्टपुत्री)
२. पाटावरवंटा
३. कापसाचे सूत
४. तांदूळ पाव किलो
५. पंचोपचार पूजासाहित्य.
परस्परनिरीक्षण
१. दोन किलो तांदूळ किंवा गहू
२. अन्तःपट (चांगले शुभ्र वस्त्र)
३. तांदूळ, गूळ व जिरे एकत्र करून (चिमूटभर)
४. दर्भ
५. अक्षता (कुंकू लावून)
६. वधूवरांच्या मागे बहिणीने हातात घ्यावयाचा कलश (पाण्याचा तांब्या), आंब्याचे डहाळे, त्यावर नारळ, व तबकात कणकीचे दिवे.
कन्यादान
१. दागिने (कन्येबरोबर द्यावयाचे असतील ते)
२. दर्भ
३. अक्षता
४. तांब्या, पंचपात्री, पळी, ताम्हन
५. कास्यपात्र
६. वरदक्षिणा
७. अभिमंत्रित उदक
८. उंबराचे कोवळे पल्लव
९. कोरे कापसाच सूत
१०.हळकुंड
११. लोकर
१२. तांदूळ (दोन ओंजळी)
१३. दूध (लहानशी वाटी)
१४. तूप (लहानशी वाटी)
१५. सुवर्ण (गुंजभर)
१६. फुले
१७. पुष्पमाला
१८. लगीनसाडी (चांगले वस्त्र, चोळी-लुगडे)
१९. मंगलसूत्र
२०. सुपार्या, हळकुंडे, लाडू.
विवाहहोम
१. माती (स्थंडीलासाठी घमेलेभर)
२. सहाण
३. साळीच्या लाह्या (अच्छेर)
४. तांब्या
५. आम्रपल्लव, गंध, फुले
६. तांदूळ (एक किलो)
७. तूप (अद्पाव, होमाकरिता)
८. सूप
९. फुंकणी
१०. समिधा-लाकडे, गोवर्या
११. गोमय.
ऐरिणीप्रदान
१. ऐरिणी (१६ लहान सुपे व १ डाली)
२. आंब्याचे डहाळे
३. पिठाचे दिवे
४. दोन खण.
सामान्य सूचना
वर्हाडासाठी भोजन हे शास्त्रात नमूद केलेले नाही. परंतु दूरवरून आवर्जुन पाहुणे येत असल्याने त्यांना भोजन देणे आवश्यक ठरते. ते यजमानाने आपापसात ठरवून द्यावे.