१.
प्रारंभिक विधी
विवाहाचे पूर्वदिवशी वधूच्या मातापित्यानी आणि वधूने, तसेच वराच्या मातापित्यांनी आणि वराने अभ्यंगस्नान करावे. सर्वांनी मंगल वेष धारण करावा.
विवाहमंडपामध्ये सडासंमार्जन करून, आणि त्यावर रांगोळी घालून सर्व जमीन सुशोभित करावी. मंडप सुशोभित असावा.
आपापल्या मंडपामध्ये शुभ्र वस्त्राच्छादित आसनावर वरपित्याने आणि वधूपित्याने पूर्वाभिमुख बसावे. त्याच्या उजव्या बाजूस त्याच्या पत्नीने, आणि त्यापलीकडे वराने अथवा वधूने बसावे.
२.
संस्कारलोप प्रायश्चित्त आणि विवाहकर्म संकल्प
नंतर आचमन, प्राणायाम करून इष्टदेवता, कुलस्वामी, घरातील वडील माणसे आणि ब्राह्मण यास नमस्कार करावा. तदनंतर देशकालादिकांचा उच्चार करावा.
तदनंतर वरपित्याने
ममास्य अमुकशर्मणः पुत्रस्य देवापित्र्यऋणापाकरण हेतुभूतधर्मप्रजोत्पादनसिद्धिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं विवाहसंस्काराख्यं कर्मं करिष्ये ॥
आणि वधूपित्याने
ममास्याः कन्यकायाः पुसवन - सीमन्तोन्नयन विष्णुबलि - जातकर्म -नामकरण-अन्नप्राशन-चौलान्तानां संस्काराणा लोपजनितप्रत्यवायपरिहारार्थं प्रतिसंस्कारं पादकृच्छ्र तत्प्रत्याम्नायगोनिष्क्रयीभूतजथाशक्तिरजतद्रव्यदानेनाहमाचारिष्ये
तथा भर्त्रा सह धर्मप्रजोत्पादनगृह्यपरिग्रह-धर्माचरणेष्वधिकारसिद्धिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं विवाहसंस्काराख्यं कर्म करिष्ये ॥
असा मंत्र म्हणून संस्कारलोप प्रायश्चित्ताचा, तसेच विवाहकर्म करण्याचा संकल्प सोडावा.
३.
मण्डप प्रतिष्ठा
तदनंतर
तदंगभूतमद्य गणपतिपूजनं स्वस्तिपुण्याहवाचनं मातृकापूजनं नांदीश्राद्धं ग्रहयज्ञं मंडपप्रतिष्ठां कुलदेवतास्थापनं च करिष्ये, इति संकल्प्य उक्तरीत्या मंडपप्रतिष्ठान्तं कुर्यात् ।
असा संकल्प मंत्र म्हणून
'मंडपप्रतिष्ठा'
आणि तदंगभूत असे
'गणपतिपूजन', 'स्वस्तिपुण्याहवाचन', 'मातृकापूजन,' 'नांदीश्राद्ध', 'ग्रहयज्ञ', 'कुलदेवतास्थापना'
आदि विधी करावेत.