मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणिसावा|

एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


तस्माञ्ज्ञानेन सहितं ज्ञात्वा स्वात्मानमुद्धव ।

ज्ञानविज्ञानसंपन्नो भज मां भक्तिभावितः ॥५॥

याकारणें गा उद्धवा । ऐसा पवित्र ज्ञानाचा यावा ।

तेथ प्रक्षाळूनि निजभावा । जीवु तो वोळखावा परमात्मत्वें ॥६४॥

जीवु परमात्मा दोनि एक । ऐसें जाणणें तें `ज्ञान' देख ।

ऐक्यें भोगणें परमात्मसुख । `विज्ञान' सम्यक त्या नांव ॥६५॥

ऐसा ज्ञानविज्ञानसंपन्न । हो‍ऊन करावें माझें भजन ।

त्या निजभजनाची खूण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥६६॥

तेव्हां जेथें देखे जें कांहीं । तें मीवांचूनि आन नाहीं ।

मग अनन्यभावें तिये ठायीं । भजे पाहीं भावार्थें ॥६७॥

ऐशिया माझ्या भजनाहातीं । उसंत नाहीं अहोरातीं ।

जागृति-स्वप्न-सुषुप्तीं । माझी निजभक्ती न मोडे ॥६८॥

विसरोनि जावें जेथें । तेथेंचि देखे मातें ।

मरण आलें विस्मरणातें । स्मरणही तेथें हारपलें ॥६९॥

यापरी ज्ञानविज्ञानसंपन्न । मजवेगळें न देखती आन ।

तैसेंचि माझें अनन्य भजन । `शुद्धभक्ति' जाण या नांव ॥७०॥

मागां मुनीश्वरीं याचि गतीं । माझी करोनि अनन्य भक्ती ।

मज पावले जैशा रीतीं । ऐक तुजप्रती सांगेन ॥७१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP