मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणिसावा|

एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


(उत्तरार्ध) स्थित्युत्पत्त्यप्ययान्पश्येद्‍भावानां त्रिगुणात्मनाम् ॥१५॥

जरी नसतें नाशवंत । तरी सगुण मानूं येतें सत्य ।

उत्पत्तिस्थितिनिदानवंत । जाण येथ त्रिगुणाचि ॥८६॥

रजोगुणें होय उत्पत्ति । सत्वगुणें कीजे स्थिती ।

तमोगुण नाशी अंतीं । हा गुणप्रवृत्ती-स्वभावो ॥८७॥

या गुणांमाजीं वस्तु असे । जिचेनि गुणकर्म प्रकाशे ।

परी जन्ममरणादि दोषें । अलिप्त वसे अविनाशी ॥८८॥

जे तिनी गुणां आश्रयभूत । जिचेनि गुणकर्में वर्तत ।

ती वस्तु त्रिगुणातीत । तेचि सांगत श्रीकृष्ण ॥८९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP