कः पण्डितः कश्च मूर्खः कः पन्था उत्पथश्च कः ।
कः स्वर्गो नरकः कः स्वित्को बन्धुरुत किं गृहम् ॥३१॥
`पण्डिताचें' काय लक्षण । `मूर्ख' म्हणावया कोण गुण ।
`सुमार्ग' म्हणावया तो कोण । सांगे निरूपण `उन्मार्गाचें' ॥६८॥
`स्वर्ग' कशातें बोलिजे । `नरक' कैसा वोळखिजे ।
सखा `बंधु' कोण म्हणिजे । `गृह' माझें तें कोण ॥६९॥