मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणिसावा|

एकनाथी भागवत - श्लोक ४० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


भगो म ऐश्वरो भावो लाभो मद्‍भक्तिरुत्तमः ।

विद्याऽऽत्मनि भिदाबाधो जुगुप्सा ह्रीरकर्मसु ॥४०॥

उद्धवें पुशिला दयेचा प्रश्न । तें न सांगोनि श्रीकृष्ण ।

परम भाग्याचें निरूपण । स्वयें आपण सांगत ॥९२॥

केवळ भाग्येंवीण । दया तितुकी वांझ जाण ।

यालागीं भाग्यनिरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥९३॥

म्हणसी कृपणाचें भाग्य । तो असतेनि धनें अभाग्य ।

परम भाग्य त्याचें चांग । जो दयेतें साङ्ग प्रतिपाळी ॥९४॥

त्या परम भाग्याचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण ।

ऐक तेथींची उणखूण । उदारपण भाग्याचें ॥९५॥

`ज्ञान' आणि `वैराग्य' पूर्ण । `लक्ष्मी' आणि `औदार्य' गुण ।

`ऐश्वर्य' आणि `यश' गहन । हे षड्‍गुण जाण महाभाग्य ॥९६॥

हे षड्‍गुण माझें भाग्य । भाग्यें पावे जो सभाग्य ।

तोचि दयेतें पाळी साङ्ग । अतिअव्यंग पूर्णत्वें ॥९७॥

जो षड्‍गुणेंशीं संपन्न । तोचि दीनदयाळू जाण ।

देऊं जाणे दान सन्मान । दरिद्रविच्छिन्न करूं शके ॥९८॥

ऐशिया सभाग्याची भेटी । होय तें भाग्य पाहिजे ललाटीं ।

माझ्या भाग्यास सृष्टीं । आणिक दृष्टीं दिसेना ॥९९॥

ऐसोनि ऐश्वर्यें संपन्न । तो दयेचें माहेर जाण ।

तिसी सोहळे करिती आपण । दया संपन्न त्याचेनि ॥५००॥

यालागीं दयेचे पोटीं । म्यां सांगितली भाग्याची गोठी ।

भूतदया जयाच्या पोटीं । तो अभाग्य सृष्टीं कदा नोहे ॥१॥

तुवां पुशिला लाभ तो कोण । ऐक त्याचेंही लक्षण ।

माझी उत्तम भक्ति जाण । `लाभ' संपूर्ण त्या नांव ॥२॥

माझी करिता उत्तम भक्ती । चारी मुक्ती पायां लागती ।

सुरवर लोटांगणीं येती । लाभ श्रीपति मी लाभें ॥३॥

हा लाभ न येतां हातीं । धनादिकांची जे प्राप्ती ।

तो नाडु जाण निश्चितीं । नरकगतिदायक ॥४॥

यालागीं परम लाभ माझी भक्ती । जेणें मी लाभें श्रीपती ।

ऐक विद्येची व्युत्पत्ती । यथानिगुतीं सांगेन ॥५॥

दृढ वासनेचिया संबंधा । शुद्धास आणी जीवपदा ।

अभेदीं उपजवी भेदा । `अविद्याबाधा' या नांव ॥६॥

देहाचे माथां वर्णाश्रम । आश्रमाचे माथां कर्म ।

त्या कर्माचा अभिमान परम । तो `जीवधर्म' देहबुद्धी ॥७॥

ते छेदोनि जीवाची बाधा । तो मेळविजे चिदानंदा ।

ती नांव शुद्ध `आत्मविद्या' । येर ते अविद्या सर्वही ॥८॥

जे निरसी गा अविद्या । ते बोलिजे शुद्ध विद्या ।

येरी शास्त्रादि चौदा विद्या । ते जाण अविद्या पाल्हेली ॥९॥

जे निरसी जीवाची बाधा । ते बोलिजे शुद्ध आत्मविद्या ।

आइक ह्रीच्या संबंधा । लाजावें सदा निंद्यकर्मी ॥५१०॥

केवळ अवयव झांकणें । ते लज्जा येथ कोण म्हणे ।

गेलियाही जीवेंप्राणें । अकर्म न करणें ते `लज्जा' ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP