भक्तियोगः पुरैवोक्तः प्रीयमाणाय तेऽनघ ।
पुनश्च कथयिष्यामि मद्भक्तेः कारणं परम् ॥१९॥
पूर्वीं भक्तीची महत्ख्याती । तुज सांगितली निजस्थिती ।
ते भक्तीची तुज अति प्रीती । तरी मी मागुतीं सांगेन ॥१४॥
ऐक उद्धवा पुण्यमूर्ती । ज्यासी आवडे माझी भक्ती ।
तो मज पढिया त्रिजगतीं । भजनें परम प्राप्ती मद्भक्तां ॥१५॥
ते भक्तीचें निजलक्षण । प्रथम भूमिका आरंभून ।
देवो सांगताहे आपण । येथें सावधान व्हावें श्रोतां ॥१६॥