निरंजन माधव - गांभीर्यवर्णन

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


रामा ! जें मगरान्वयीं विलसतें गांभीर्य तें सागरीं

दावी उदभट हें यथार्थ जलधी हा निर्मिला सागरीं ।

तूंही सागरजात शोभसि बरा गांभीर्यरत्नाकरा !

तूझी ते तुळणा नयेचि सहसा ब्रह्मादिकां किंकरां ॥६९॥

सिंधूचा तरि थाव लागल कधीं रत्नासि संख्या घडे

त्याचाही परपार दृष्टिस कधीं होयील लोकांपुढें ।

तूझ्या खोलपणासि अंत नलगे तो पार लागेचिना

तुझी सदगुणरत्नराशिगणना देवांसि होईचना ॥७०॥

पाठीणी पुसते झषासि सगरीं हा खाणिला वारिधी

हा अक्षोभ्य अपार पार नलगे आह्मांसि याचा कधीं ।

झाला तत्कुलरत्न राघव विभू त्याच्या गुणाचा जना

कैसा लागल पार हेंच मजला आश्चर्य वाटे मना ! ॥७१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP