Dictionaries | References

विखरणी

   
Script: Devanagari

विखरणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   scattering about &c.

विखरणी

  स्त्री. इकडे तिकडे पसरणें इ० . [ विखरणें ] विखरणें - उक्रि . १ अव्यवस्थित रीतीनें इकडेतिकडे पसरणें ; उधळणें . दहींभात विखुरला चहुंकडेअद्यापि शुभ्र दिसती सूक्ष्म खडे । . २ निष्काळजीपणानें टाकणें , ठेवणें ; इकडे तिकडे लोळवणें ( स्त्रीच्या डोक्यावरील केस ). ३ चेंदामेंदा , तुकडे तुकडे करून फेंकून देणें . भीम गदा हाणुनि त्या सद्विरद क्षेमधूर्तिला विखरी । - मोकर्ण ८ . ३० . ४ वृष्टि करणें ; शिंपडणें . माते , ज्याचें नाम स्वरतांवरि अमृत नित्य विखरीतें । - मोहनुमद्रामायण १६ . - अक्रि . विस्कटणें ( केंस , इ० ) [ सं . वि + कृ - विकिर ; ग्रा . विखर ; हिं . विखरना ; गुज . विखरवुं ; पं . विख्‍खरना ] विखरा - पु . १ विखरलेली स्थिति . २ अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू ; पसारा . ३ उधळपट्टी ; खर्च . ओटीभरणाचा गजर पुढें आहे । द्रव्याचा विखरा । - पला ९२ . विखुरणी - स्त्री . विखरणी पहा . विखुरणें - क्रि . विखरणें पहा . १ पसरणें . विखुरले विकत्याचे कांटे । - ज्ञा ७ . १७० ; - अमृ २ . ७ . २ तळमळणें . आम्हां नाहीं त्याचा घडला आटव । त्याचा बहुजीव विखुरला । - तुगा ६०६ . ३ फुटणें . माझें करुणावचन । न ऐकती तुझे कान । ऐकोनि पाषाण । विखुरतसे । - गुच १ . १३८ . विखुरी , विखूरी - स्त्री . प्रसार ; पसारा . चांदोचिया दोंदावरी । होत चांदणियाची विखुरी । - अमृ १ . ५६ . [ विखुरणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP