मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय ३४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत तदनंतर सांगत । मलामासाचें महत्त्व अद्‍भुत । मुनिश्रेष्ठ शौनक ऐकत । सर्वार्थदायक महाव्र्त ॥१॥
कलि कर्दमरूप मळानें युक्त । एकदा देवा केशवा शरण जात । विप्रेंद्र मुख्यांच्या सहित । स्तविती विविध स्तोत्रांनीं ॥२॥
धर्म प्रपालकास विष्णूस स्तवून । घोर कलिजन्मपाप कथन । करून विचारिती उन्मन । म्हणती आम्हां उपवास घडती ॥३॥
लेशमात्र धर्म राहिला । अधर्में धर्मं नष्ट केला । त्यायोगें पीडितां आम्हांला । राख आतां शरणागतांसी ॥४॥
पापरूपी कलीनें जिंकिलें । पृथ्वीस त्यागून वास्तव्य केलें । महाप्रभो आपणही स्वस्थ कां झाले । दुःख या वेळ कां ऐसें ॥५॥
त्याचें वचन ऐकून । श्रीहरि बोलले मेघगंभीर वचन । सर्वांचे पालक जे महान । देव विप्रहो भिऊं नका ॥६॥
मी करीन तुमचें काम । सुदुर्जय कलीस जिंकीन सकाम । ऐसें आश्वासून मनोरम । निरोप दिला देवर्षींना ॥७॥
तदनंतर चित्तीं विचार करित । कलीचें बळ घोर असत । तरी कलिमलनाशार्थ सांप्रत । काय करावें फलदायी ॥८॥
माधवासी उपाय आठवत । तो मयूरक्षेत्री जात । गणपाचें ध्यान करित । तपश्चर्या करूं लागला ॥९॥
मलमास लागतां आचरित । गाणेशपंचक पूजित । मलमास व्रत आचरित । नाना पापसंहारक जें ॥१०॥
घृताहार सेवून यत्नयुत । तो गणनाथास सेवित । उषःकाळीं स्नान करित । ढुंढीचें चिंतन अविरत करी ॥११॥
ढौंढमासाचें करून व्रत । जनार्दन नंतर पारणा करित । ब्राह्मणांच्या संगतींत । रात्रीं सुखें निद्रा करी ॥१२॥
त्या रात्रीं पडलें स्वप्न । पाही धूम्रवर्ण गजानन । अश्वारूढ विघ्नेश पावन । खड्‍ग चर्मधारी दोन करांत ॥१३॥
तो महाविष्णूस म्हणत । भक्तपालक प्रसन्नचित्त । मेघगंभीर स्वरांत । मलमास व्रत महान माझें ॥१४॥
त्यायोगें नानाविध मल नष्ट होत । तें तूं आचरिलें व्रत । जोडिलें अपूर्व सुकृत । माझ्या भक्तिप्रेमानें ॥१५॥
मलमासाचा मी देव पुनीत । धुंडून काढितो पाप समस्त । मलसंभूत जें वर्तत । धुवूनि टाकी सत्वर तें ॥१६॥
म्हणून मीं तुज वर देत । तूं मज स्मरतां ह्र्डयांत । कलीस जिंकशील त्वरित । धर्मसंस्थापना करशील ॥१७॥
ऐसें बोलून अंतर्धान । पावले जेव्हां गजानन । केशवास जाग येऊन । आठवून स्वप्न तो आनंदला ॥१८॥
मयुरेशास नमून । नराधिक वेष घेऊन । श्याम अश्वावरी बसून । खड्‍ग हातीं घेतलें ॥१९॥
काल्कि त्याचें नाम ख्यात । महाबाहु तो विघ्नेश्वरा चित्तांत ध्यात । स्वंगातून नानाविध सेना निर्मित । दुष्टांच्या वधार्य कटिबद्ध ॥२०॥
नाना हृदयांत जो निवसत । तो कलि अत्यंत । प्रयत्न करित । कल्कीस जिंकण्या वांछित । परी तो हीनवीर्य झाला ॥२१॥
तदनंतर स्वधर्मीं रत । जनार्दन लोकांस करित । दृष्टांस मारून स्थापित । ब्राह्मणोत्तमांना स्वस्थानीं ॥२२॥
ऐसें करून अंतर्धान । पावला तो जनार्दन । देवर्षि करिती स्तवन । वैकुंठलोकीं परतला जैं ॥२३॥
शौनक विचारी सूताप्रत । धूम्रवर्णाख्य अवतार ख्यात । कलीशी युद्ध तो करित । जिंकिलें त्यानें कलीसी ॥२४॥
आतां विष्णूनें कलीस जिंकिलें । ऐसें सूत तूं वर्णिलें । हें द्विविध वर्णन कैसें केलें । संशय हा दूर करावा ॥२५॥
सूत सांगे तयाप्रत । महाघोर हा कलि ब्रह्मनिर्मित । पापसेनेच्या साहाय्यें जिंकित । धर्मासी तो क्षणोक्षणीं ॥२६॥
त्याच्या नाशार्थ देव मुनिगण । नाना अवतार घेऊन । प्रयत्नें जिंकिती त्यास धर्मरक्षण । विविध प्रकारें ते करिती ॥२७॥
गणराजाच्या वरानें मुळासहित । कलि संपूर्ण नष्ट न होत । पुनरपि तो बृद्धि पावत । म्हणोनि केलें द्विविधवर्णन ॥२८॥
दहा वर्षांची गर्भवती । होईल कलियुगीं निश्चिती । घरोघरीं लोक जगती । तीस वर्षांचें आर्युमान ॥२९॥
वर्णसंकर होईल सर्वत्र । धरातळ होईल संत्रस्त । सार्ध एकभाग विश्वस्थ । धर्म होईल महामुने ॥३०॥
तेव्हां विष्णू सुरादींनीं प्रार्थित । कल्किरूप स्वयं घेत । कलीस जिंकून स्थापित । पुनरपि परमधर्मासी ॥३१॥
जेव्हां पांच वर्षांची स्त्री होत । गर्भवती कलियुगांत । सोळा वर्षें मानव जगांत । अल्पायु ते घरोघरीं ॥३२॥
महाघोर कलीस पाहून । हताश होती शिवादिक दीन । त्यास जिंकण्या असमर्थं होऊन । अत्यंत खिन्न होतात ॥३३॥
विश्वाधर्म रूपें धरातलावर । धर्मं उरेल अल्पफार । जन करती हाहाकार । तेव्हां विश्वेश्वरा शरण सारे ॥३४॥
त्यास सारे प्रार्थित । तैं गणाध्यक्ष कलीस जिंकित । सुदुर्जय परी सुलभ जय होत । विश्वेश्वरासी त्या वेळीं ॥३५॥
पुनरपि धर्मसंस्थापना करिता । ऐसें हें यन्त्र चालत । कलिबळ पुनःपुन्हा वाढत । तेव्हां घेई अवतार ॥३६॥
ऐश्यापरी मलमासांत । जनार्दनें केलें व्रत । कलिमल संपूर्ण जिंकित । महापापौघरूप कलिमल ॥३७॥
अन्यही एक आख्यान । मलमासाचें माहात्म्य वर्णंन । धौम्य सौम्यतप आचरून । परम तेजस्वी जाहला ॥३८॥
तो योगप्राप्तिस्तव जात । दधीची चरणांचा आश्रय घेत । योगपारंगता श्रेष्ठ । म्हणे विनयपूर्वक त्या वेळीं ॥४०॥
तपश्चयनें स्वर्ग भोग लाभत । सर्वं जनांसी निश्चित । परी ब्रह्मभूयपद विश्वांत । तपाने न मिळे कदापि ॥४१॥
म्हणोनि मज ऐसा योग शिकवी । शांतिप्रद जो चित्ता होई । तो साधून कृतकृत्य भवीं । होईन मीं विशेषें ॥४२॥
ब्राह्मण ब्रह्मांत तन्मय होती । म्हणोनि ब्राह्मण करी मज जगतीं । धौम्याचें वचन ऐकून स्वचित्तीं । तोषला तो दधीची ॥४३॥
त्या महाभागास हर्षयुक्त । म्हणे ब्रह्म नानाविध ख्यात । वेदादींत असे वर्णित । गाणेश ब्रह्ममुख्य असे ॥४४॥
ब्राह्मणांसी ब्रह्मदायक । ऐसा हा गणेश सुखकारक । मीं पूर्वी होतों स्पर्धक । क्षुमनाम राजाचा ॥४५॥
निरंतर शैव होऊन । क्षुपार्थ आलेल्या विष्णूस जिंकून । योगपरायण यावन । सहज ब्रह्यांत सुस्थित मीं ॥४६॥
तेथ स्वाधीन भाव पाहून । श्रांत झालीं मीं विजितमन । स्वाधीनत्व तेथें पराधीनत्व जाण । ब्रह्मरूपीं न दिसतसे ॥४७॥
तदनंतर शांतिलाभार्य जात । आगम प्रमुख शंकराप्रत । त्या महादेवांस नमित । स्तवन करी विविधप्रकारें ॥४८॥
तेव्हां शंभु मज म्हणत । स्मित करून ऐसें हित । विप्रा दधीचे सांप्रत । कां आलास सांग मजला ॥४९॥
शिवाचें ऐकून वचन । हर्षयुक्त म्हणे हात जोडून । दधीची करितसे स्तवन । अति विस्मित होऊनियां ॥५०॥
शंखरासी शिवासी । सुखवादीसी सहजब्रह्मासी । नेति रूपप्रधारकासी । शंकरासी नमन असो ॥५१॥
स्वामी मी अव्यक्तग असत । परी ब्रह्मप्राप्त्यर्थ झटत । घोरभाव पाहून अति विस्मित । सहज ब्रह्म कैसे स्वाधीनत्व झालें ॥५२॥
स्वाधीनाहून परम जें ब्रह्म । योगसेवेनें मिळणें अशक्य अनुपम । स्वाधीनत्व पराधीनत्व मनोरम । ब्रह्मांत हें कांहीं न दिसे ॥५३॥
तरी स्वाधीनज मोह कैसा धरित । सहजात्मक होतां क्षेत्रांत । मी शैव सदा प्रयत । तुज सांगतॊं परात्पर ॥५४॥
म्हणोनि तुझा शरणागत । शांतियोग सांगावा मजप्रत । शिव म्हणे उत्तम मजप्रत । प्रश्न विचारिला विप्रा तूं ॥५५॥
सर्वांसी सुखदायक शोभन । सांगतों महायोगा । तन्मयताकर पावन । स्वाधीन त्रिविध बसून । तुरीय सहज ब्रह्म स्वाधीन ॥५६॥
चारांच्या संयोगें स्वानंद ख्यात । स्वसंवेद्ययोगें लाभत । योग्यांसी सदा जगांत । पांच वर्जित तो अयोग ॥५७॥
तेथ ब्रह्मांचा योग न होत । जगेंही न होतीं निर्मित । त्यांच्या योगें शांतियोग ज्ञात । महायोग्या सर्वदा ॥५८॥
पंचचित्त भाव सोडून । शांति लाभशील महान । मी गणेशरूप असून । भिन्नत्व नसे आमुच्यांत ॥५९॥
सदा संयोगता निवसत । अयोगता भ्रांतिदा कशी राहत । पंचचित्तमयीं बुद्धी ख्यात । सिद्धि प्रख्यात भ्रांतिकरी ॥६०॥
ह्या दोन्ही माया त्यागून । होशील चिंतामणी गजानन । ऐसें बोलून शंभु प्रसन्न । देता झाला मज मंत्र ॥६१॥
गणेशाचा एकाक्षर मंत्र देत । मजला म्हणोनि मी भ्रांतयुक्त । म्हणे मीं शैवनाथा सतत । हे काय मजसी सांगतां ? ॥६२॥
गणेशोपासना कां दिलीत । कोणत्या मार्गें भजूं त्यास सांप्रत । शिव म्हणे गन समूहयुक्त । सद्रूपभावना करी तूं ॥६३॥
सहजांच्या समायोगें मी होत । गणपाचा गण विश्वांत । गणेशाअच्य आकारभावें सतत । सर्वही प्राणी गणरूप ॥६४॥
तरी त्यांत कोणता व्यभिचार । तुझा सांग सांप्र्त होणार । ऐसें बोलून शंभू थोर । मौन धरिता जाहला ॥६५॥
मीं संशयहीन होऊन । करून शंभूला वंदन । उपासना वनांत जाऊन । केली हया श्रद्धेनें ॥६६॥
जैसें शंभूनें सांगितलें व्रत । तैसें आचरिलें एकचित । योगशांति मजसी प्राप्त । जाहली शंभूच्या प्रसादानें ॥६७॥
सदा शांतियुक्त चित्तें भजत । द्विरदाननासी निष्ठावंत । गुरूरूपधर शंभूसीही पूजित । गाणपत्य मीं आदरें ॥६८॥
ऐसें सर्व ब्रह्मप्रद चरित । सांगितलें तुज पुनीत । तूंही गणराजास पूजी भावयुक्त । षोडशाक्षर मंत्र देतों ॥६९॥
दधीची तो मंत्र देत । धौम्य तो योगज्ञ स्वीकारित । पुनरपि सांगे तयाप्रत । गणेशमहिमा सविस्तर ॥७०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खण्डे धूम्रवर्णचरिते मलमासमाहात्म्ये दधीचिधौम्यसंवादो नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्णणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP