खंड ८ - अध्याय ४३
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ देवऋषि भ्रुशुंडीस म्हणती । गणेशाचें माहात्म्य जगतीं । दर्शनस्मरणमात्रेंचि ख्याति । सर्वसिद्धिप्रद ऐसी ॥१॥
मुनिसत्तमा या जगांत । गणेश्वराचें जन दर्शन घेत । नामसंकीर्तन एकाधिक वेळा करित । परी फळ त्याचें काय मिळतें ॥२॥
ते सर्व जन सुखसंयुक्त । भोग भोगून मनोवांछित । अंतीं ब्रह्मभूत होत । ऐसें ना दिसे त्यास कारण काय ॥३॥
भ्रुशुंडी त्यास उत्तर देत । अविश्वासें अर्धे फळ नष्ट । अभक्तीनें । पादसंभूत । दंभानें त्रिपट नष्ट पावे ॥४॥
म्हणून संपूर्ण फलहीण । होतीती या जगतीं जन । शास्त्रोक्त पुण्यहीन । ह्याच कारणें ते असती ॥५॥
अन्यही एक विचार असत । पुण्य पाप समान ज्ञात । बल तेज भावांनीं युक्त । ऐसें शास्त्रें सांगतीं ॥६॥
गणेशनामाच्या कीर्तनें पुण्य । तैसें गणेशनिंदेचें पाप न क्षम्य । अतुल तें पाप पुण्य । उभय विरोधें फल न मिळे ॥७॥
ब्राह्मभावपरायण जन । भजती गणेशा नितनेम घेऊन । परी ते निंदाही करिती म म्हणून । फळ न मिळे तयांसी ॥८॥
तुमचा संशय दूर करण्यास । आणखी एक कारणास । सांगून करितों चर्चेस । फलहीन कां जन होती ॥९॥
गणेशाच्या उपासनेंचें । उल्लांघनादिक पाप साचें । तैं शतगुणित व्हावयाचें । यांत संशय अन्य अने ॥१०॥
गणेश्वराचें स्थान जाणून । जे जन करिती उल्लंघन । ते त्यायोगें भोगविहीन । होऊन जाती नरकांत ॥११॥
नाना विघ्नांनीं युक्त । जन्मोजन्मीं ऐसें जन होत । यांत संदेह नसत । गणेशौल्लंघनाचें पाप कठिण ॥१२॥
गणेशाचा मान करून । जें स्वल्प पुण्य सुखनिधान । उल्लंघनाच्या बळें नष्ट होऊन । मंद क्षीण तें होतें ॥१३॥
जैसें विधीच्या यज्ञांत । गणनाथकास तो विसरत । तेव्हां सर्व देव जलरूप होत । ऐसी कथा ख्यात असे ॥१४॥
महातप्रमाभावें युत । ऐश्या स्त्रियांनी ते युक्त । पुनरपि देवरूप लाभत । स्वल्प उल्लंघनाचें पाप महा ॥१५॥
गणेश स्मरण जे करिती । ते जनही म्हणोनी भोगिती । दुःख सारे या जगतीं । नरकांत जातीं उल्लंघनपापें ॥१६॥
आणखी एक सांगेन । कर्मशास्त्रांत ज्याचें वर्णन । प्रत्यवायाते आकुल होऊन । विविधपणे सर्वत्र ॥१७॥
प्रत्यवायांची पर्वा न करित । आपुलें कर्म जरी करित । सकल पुण्य तयाप्रत । कदापि न लाभे ॥१८॥
ऐसे बहुविध भेद केले । विघ्नेश्वरानेच ते कथिले । अखंड क्रीडनार्थ जे जाहले । गणेशाच्या कार्यी अवर्णनीय़ ॥१९॥
अपारमहिमा युक्त । गणेशाचें माहात्म्य निश्चित्त । त्याच्या खंडनार्थ निर्मित । निंदादिक तोच सारें ॥२०॥
म्हणोनि भजा गणपतीस । देवहो तुम्हीं करा हितास । त्यायोगें पूर्णत्वें तयास । प्राप्त कराल देव मुनींनो ॥२१॥
सुरर्षी आणखी प्रश्न करिती । जरी हा गणेश योगरूप जगतीं । तरी कैसा पुरुषभाव तयाप्रती । एकदेशमय मज सांगावा ॥२२॥
सांगा तयाचें चरित । तेव्हां भ्रुशुंडी सांगत । जेसें ब्रह्म नपुंसकलिंगी ख्यात । स्त्रीपुंभावविहीन ॥२३॥
स्त्रीपुंनपुंसक त्रिविध वचन । आत्मा चतुर्थवाचक असून । स्त्रिभाववर्जित जाण । तैसा हा असे गजानन ॥२४॥
वेद त्यास म्हणती गजानन । एकमार्गाश्रित सर्वं असून । वेदही करण्या वर्णन । अक्षम ठरले तयाचें ॥२५॥
म्हणून हा गणनाथ । पुंभावात्मक प्रख्यात । जैसा योगादिक शब्द असत । तैसेचि देवादि ज्ञात जाणावे ॥२६॥
वामांगीं प्राकृत रूप । सिद्धि त्या महात्म्याच्या असत । दक्षिणांगीं बुद्धि पुरुषवाचक ज्ञात । महाभागहो हें रहस्त ॥२७॥
त्यांच्या योगें गणेशान । योगाकार हा महान । पुंभावादियुत असून । असे त्या भावांनी वर्जितही ॥२८॥
देवर्षी तेव्हां विचारितो । चतुर्थी अत्यंत प्रिय त्याप्रती । तरी ती रिक्त कां ख्यात जगतीं । विवाहादींत विवर्जिंत ॥२९॥
साक्षात मंगलमूर्गीची तिथी । मंगलदायक असून जगतीं । तिज सर्वदा रिक्त म्हणती । हें कैसें जाहलें येथ ॥३०॥
भ्रुशुंडी ह्याचें उत्तर देत । देवमुनींनो महिन्यांत । चतुर्थी तिथि उभय पक्षांत । गणपप्रिय व्रतादिभूत ॥३१॥
गणेशप्राप्तिकारक असत । चतुःप्रद पूर्ण हें व्रत । सर्वसिद्धिप्रदायक पुनीत । नित्यवत् करावें मानवांनी ॥३२॥
तेव्हांच त्यांना होतील प्राप्त । चार पदार्थं हें संशयातीत । अन्यथा ते जें कर्म करित । तें तें निष्फल होत असे ॥३३॥
म्हणून त्या तिथीस रिक्त म्हणती । सर्व कार्यांत गुंतता मती । व्रतांत भंग होऊ नये जगतीं । म्हणोनि ऐहिकांत रिक्तात ॥३४॥
विवाहादिक कार्यांत । भोजन करिती जन मुदित । नानाविषयसंगघडत । तेथ व्रत कैसें घडणार ॥३५॥
म्हणून संशयहीन होऊन । व्रतमार्गें करावें भजन । मंगलायतना पूर्णा ही तिथि महान । सर्वंसिद्धिप्रद चतुर्थीं ॥३६॥
जन्ममृत्युयुत लोकांनीं पूरित । असे हें सकल जगत । चतुर्थीव्रत जे जन करित । जन्म मृत्यूंनी विवर्जित ॥३७॥
कर्मफल सारें त्यागून । करिती निजलोकीं गमन । होऊन सर्व संकटहीन । भोगिती सर्व ऐहिक भोग ॥३८॥
मनेप्सित सारें लाभून । ब्रहुअभूत होती चतुर्थीव्रतपरायण । व्रतमातें विश्व रिक्त करी म्हणून । रिक्ता म्ह्णणती चतुथींस ॥३९॥
विश्व सोडून गणेसप्रत । जाती चतुर्थीव्रत जे करित । त्यायोगें सर्व जगत । रिक्त होतें मुनि अमरही ॥४०॥
अन्य तिथींप्रमाणें रिक्त । नसे ही चतुर्थी तिथि उदात्त । ब्रह्मभूयप्रदात्री । वर्तत । सर्वांसी सुखप्रदायिका ॥४१॥
ऐसें हें सर्व सांगितलें । गणेशमाहात्म्याचें रहस्य भलें । व्रतसुखाचें रह्स्य कथिलें । आणखी काय ऐकण्या इच्छिता ॥४२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खण्डे धूम्रवर्णचरिते चतुर्थीरहस्यवर्णनं नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP