मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
महिपतिदास योगी

दत्तभक्त - महिपतिदास योगी

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

(सन १६११-१६९८)

सतराव्या शतकात बागलकोटहून येऊन विजापूरला स्थायिक झालेल्या रंगभट काथवटे यांचे हे नातू. हा मोठा योगी होईल असे भविष्य प्रल्हाद कृष्णाचार्यांनी वर्तविले होते. ते लहानपणीच सर्व शास्त्रांत पारंगत झाले. गोलघुमटाचा निर्माता महमद आदिलशहा गादीवर असताना यांनी विजापूर येथील नृसिंहमंदिरात प्रवचने करून लौकिक संपादन केला. बादशहा व त्याचे सरदार यांनाही यांच्या प्रवचनाची गोडी असे. अनेकांना दीक्षा दिल्यानंतर ते काखंडकीस येऊन स्थायिक झाले. त्यांना मराठी, कन्नड, तेलगु, संस्कृत, उर्दु, पारशी इत्यादी भाषा येत असत. विविध भाषांतून त्यांची पदरचनाही आहे. गृहस्थाश्रमी महिपतीदासांनी आपल्या वडिलांकडूनच उपदेश घेतला होता. यांचे आठवे वंशज श्रीपतय्या सोमय्या हरिदास यांनी यांची माहिती प्रथम उजेडात आणली. यांचे एक मराठी पद देण्यासारखे आहे.

दत्तदिगंबरु तूंचि माझा गुरु ।
जाणा तो निर्धारु स्वामी माझा ॥धृ॥
दत्त द्वित्ताक्षर नाममंत्र थोर ।
दत्त हो संचार तारीयेला ॥१॥
दत्त दत्त म्हणता अदत्तपण गेला ।
द्त्त हे लाधला दत्तपण ॥२॥
दत्त आत्माराम दत्त देवोत्तम ।
दत्त भवश्रम निरसियेला ॥३॥
दत्त पाहतां जेथ, आहेच तो तेथ ।
दत्तावीण रिता ठाव नाहीं ॥४॥
दत्त माझा प्राण सद्‌गति साधन ।
बाह्यांतर परिपूर्ण देव माझा ॥५॥
दत्त माझी माता दत्त माझा पिता ।
महिपतीचा दाता दत्त एकु ॥६॥


N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP