दत्तभक्त - निपटनिरंजन
महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात.
(सन १६२३-१७३८)
हे एक संतकवी असून यांचा जन्म बुंदेलखंडातील चंदेरी गावी चिझौतिया जातीच्या गौड ब्राह्मण कुळात झाला. लहानपणापासून यांच्या मनावर धार्मिक संस्कार होते. संत दादू दयालची भजने हे आवडीने गात. सन १६६३ च्या सुमारास आपल्या वृद्ध मातेला घेऊन हे बर्हाणपूरमार्गे औरंगाबादेस आले आणि तेथेच राहू लागले. औरंगपुर्यात एकनाथमंदिराजवळ चिलखते वगैरे बनविण्याचा यांचा छोटा व्यवसाय होता. पंरतु धंद्यात अपयश आल्याने ते निराश झाले. वृद्ध आई मृत्यू पावली तेव्हा गरिबीमुळे त्यांना तिचा अंत्यसंस्कारही नीटसा करता आला नाही. आईच्याच चितेवरची राख अंगाला फासून हे पूर्ण बैरागी बनले. ध्यानधारणा व योगसाधना यांत त्यांचा काळ जाऊ लागला. काही दिवसांनी मठाच्या बागेतच यांना दत्तदर्शन झाले. कोणा चर्पटनाथ नामक साधुपुरुषाकडून यांनी देवगिरीवर गुरुपदेश घेतला. अष्टमहासिद्धी त्यांना प्राप्त झाल्या. प्रत्यक्ष औरंगजेबावरही या योगी पुरुषाच्या सामर्थ्याचा प्रभाव पडला. त्यांची काही पदे व दोहे प्रसिद्ध आहेत.
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2018
TOP