दत्तभक्त - सिद्धेश्वर महाराज
महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात.
(सुमारे सतरावे शतक)
बिदर जिल्ह्यातील बिदर गावापासून सुमारे आठ मैलावंर साधोघाट हे कर्नाटकातील प्रतिपंढरपूर म्हणून क्षेत्र आहे. येथे आजही निबिड अरण्य असून सुमारे तीनशे वर्षापूर्वी एका गरीब कुटुंबात शंकराच्या कृपाप्रसादाने एक बालक जन्मास आले. या बालकाने वयाच्या आठव्या वर्षापासून तपश्चर्येस आरंभ केला. त्याने विठ्ठलाच्या साक्षात्कार झाल्यानंतर विठ्ठलाच्या मृण्मयी मूर्तीची उपासना चालू केली. येथे विठ्ठलाच्या गर्भगृहाच्या मागे एक विहीर असून तेथे दत्तात्रेयांचा गुप्त वास आहे. असे सांगतात की, या स्थानातील केरकचरा पहाटे तीन ते पाचच्या वेळात आपोआप गोळा होतो. पांडुरंगाच्या नजीक असलेल्या दत्तप्रभावामुळे चमत्कार होत असल्याच्या हकीकतीही मिळतात.
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2018
TOP