मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|प्रमुख दत्तभक्त|
औदुंबरचे नारायणानंद स्वामी

दत्तभक्त - औदुंबरचे नारायणानंद स्वामी

महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात. 

कारवार जिल्ह्यातील ओणेकई या लहानशा गावात स्वामींचा जन्म झाला. त्यावेळी त्यांचे नाव महाबलेश्वर अथवा तिमण्णा असे होते. त्यांना बालपणापासून आध्यात्माची ओढ होती. हे जन्माने गुजराथी असले तरी मराठवाडयात गुंज येथे राहून त्यांनी दत्तसंप्रदाय वाढविला. ईश्वरीकृपा व संतसंगत यांच्या आधाराने त्यांनी अनेकांना सन्मार्ग दाखविला.

ज्ञान, कर्म, उपासना या तीनही मार्गांत ते निष्णात होते. ज्योतिषशास्त्र आणि मंत्रशास्त्र यात ते सिद्धहस्त होते. निरहंकारी मन व प्रेमळ वृत्ती यांनी लोकांना जवळ केले. त्यानंतर त्यांनी औदुंबर येथे वास्तव्य केले. एकांत आणि अल्प आहार त्यांना प्रिय होता.या स्वामींचे चरित्र सुधांशु यांनी ‘श्रीसदुरू नारायणानंद चरित्रामृत’ या नावाने प्रसिद्ध केले आहे. मृत्यूपूर्वी स्वामींनी आपल्या आश्रमात श्रीगुरू शिवशंकरानंद दत्तमंदिर बांधून घेतले. मंदिरासमोर त्यांची समाधी आहे.

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP