तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [शार्दूलविक्रीडित]
हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.
आंबे नारळ केळ एक न मिळे भक्षावयाला कदा ।
गोवारी उकडून येत पुढती किंवा बटाटे सदा ॥
लावावी मिरपूड मीठ वरती ऐशी जनांची रिती ।
होती येऊन हाल ज्या अडचणी त्या आज सांगू किती ॥१९॥
तैनातीस जिथें चुकूनि तुमच्या स्वप्नांत नाहीं गडी ।
घंटा वाजवितां सदैव तरुणी येते पुढें तांतडी ॥
दावी ती मग बॉल हाल गमती होतात ज्या ज्या नव्या ! ।
किंवा सुंदर वस्तुही पुरविती ज्या ज्या तुम्हाला हव्या ॥२०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP