मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कृष्‍णाजी नारायण आठल्‍ये|

तिकुडचें पहिलें पत्र - श्लोक [शार्दूलविक्रीडित]

हे पुस्तक ' केरळकोकिळ ' या मासिकात प्रथम १९१७ साली छापण्यांत आले.


सोडोनी निघतां तुला खळखळा त्‍वां ढाळिलीं आसवें ।
वाटे कां नच आणिली तुजशि मी तेव्हांच माझ्यासवें ॥
कंठाया परदेश त्‍वत्तनु सखे वाटे मला कोमला ।
आलों ह्यास्‍तव सोडुनि तुज परी ता खेद होतो मला ॥३४॥

येथे प्रत्‍येक वस्‍तु बघुनि पटतसे नित्‍य चित्तास बोध ।
कानीं येती अहाहा ! हरघडिस किती कल्‍पनातीत शोध ॥
उद्योगाचा यशाचा झडुनि चवघडा थोर साम्राज्‍य चाले ।
आत्‍मोन्नति-प्रकाशें सुमति उजळतें राहतां अल्‍प कालें ॥३५॥

वाटे हा देश नोहे अनुपम विधिनें निर्मिला स्‍वर्ग अन्य ।
पाहोनी काय सांगू प्रियतम सखये ! जाहलों धन्य धन्य ॥
शिष्‍टाचारांत ह्यांची बहुत सुजनता व्यक्त होय स्‍वभावं ।
नाहीं उद्दामवृत्ती मृदु मधुर सदा बोलती नम्रभावे ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP