अध्याय पहिला - अभंग १६ ते २९

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


तात म्हणे, " इछितसें ऐकाया मीं तथापि तें कार्य;
म्हणति, ‘ असाध्य न कांहीं, कृतनिश्चय जो, तया, ’ असें आर्य ". ॥१६॥
पुत्र म्हणति, ‘ परिसें, जें निजवृत्त पित्या ! ऋतुध्वजें कथित,
कथितों ज्याच्या श्रवणें सर्वांचें हृदय होतसे व्यथित. ॥१७॥
ज्या शुद्धपोनिधितें सानंद सदा सुरेशपुर गातें,
गालव शत्रुजितातें भेटे, आणूनि दिव्य तुरगातें. ॥१८॥
पूजेतें स्वीकारुनि गालव बोले असें, " आगा ! राया !
आलों तुज कळवाया दु:सह निजताप मीं अगारा या. ॥१९॥
कोणी दैत्य करितसे नित्य उपद्रव मदश्रमीं बापा !
तापा साहों, न शकें द्याया सुतप:क्षयावहा शापा. ॥२०॥
आश्रमपदास माझ्या तापद तो, मोह जेंवि विश्वास;
म्यां सोडिला, विलोकुनि अंबर, होऊनि खिन्न, निश्वास. ॥२१॥
तों दिव्याश्व उतरला व्योमांतुनि, जाहली गगनवाणी -
‘ हा शत्रुजितातें दे, तुझिया सुयशा सुखा मग न वाणी. ॥२२॥
पृथ्वीवलयाक्रमणीं अश्व अतिसमर्थ, म्हणुनि हा नावें
‘ कुवलय ’ विख्यात यशें होयिल, विश्वेंहि यासि वानावें. ॥२३॥
यावरि बसुनि, ऋतुध्वज होयिल हरिसाचि मान्य विश्वास.
कवि ‘ कुवलयाश्व ’ म्हणतिल, तूं उष्ण न सोडिसील निश्वास. ॥२४॥
अप्रतिअहतगति वाजी पर्वतपाताळगगनजळधींत,
हा रविदत्त मद उरों देयिल न निशाचरादिखळधींत ’. ॥२५॥
आज्ञा आतांचि करीं, सनया तनया स्वधर्मदक्षा या,
चढुनि कुवलयीं तेजें निजविप्रादिप्रजांसि रक्षाया ". ॥२६॥
राजा म्हणे, ‘ अवश्य; ’ स्वसुतासि बसावयासि दे वाजी;
सेवा जीवहिता तो वरि, रुचली फ़ार वासुदेवा जी. ॥२७॥
‘ जा, जोडीं यश; ’ ऐसें नृप तनया, फ़ुल्ल करुनि गाल, वदे ’.
गाधिज जेंवि दशरथा, आशी राज्या तसाचि गालव दे. ॥२८॥
राजकुमारा पावुनि, न म्हणे गाधिज तसाचि गालव ‘ हा ’;
व्यासमुनि म्हणे, ‘ भवभयशमना सत्कीर्तिचाचि गा लव हा ’ ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP