अध्याय पांचवा - अभंग ४१ ते ५०
मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.
शरणागतगोविप्रत्राणार्थ रणीं शरीर सोडावें,
जोडावें पुण्य यश; ज्ञातिश्रुतिवच कधीं न मोडावें. ॥४१॥
विधिवत् सर्व सव करीं, विप्रांतें विपुल वित्त दे हातें;
वृद्धपणीं सोड, वनीं करुनि तपें शुद्ध चित्त, देहाते. ’ ॥४२॥
यापरि उपदेश करुनि, देवीनें तो कुमार कवि केला;
मातेच्या शिक्षेला वश होय जसा सदश्व कविकेला. ॥४३॥
झाला प्रौढगुणी, मग अनुरूपा करुनियां दिली महिला,
ती प्रसवी सुतरत्नें, जीं योग्यें भूषवावया महिला. ॥४४॥
जाणुनि धर्मनयज्ञ, क्षितिरक्षाक्षम, विनीत, शुचि तातें
अभिषेक करुनि, दिधला निजराज्यपदाधिकार उचितातें. ॥४५॥
वृद्धपणीं सुविवेकें गमले बहुभोग ते सपक राया,
जाया तपोवनातें, जायासख तो निघे तप कराया. ॥४६॥
तेव्हां मदालसा ती उपदेश करी तया सुता चरम;
‘ वत्सा ! दु:ख शमाया तुज एक उपाय सांगत्यें परम. ॥४७॥
तुज बोधाया बा ! या मुद्रागर्भीं असे चिटि कवीला,
ती कथिल तें करावें; ताप गुरुक्तें नसेचि टिकवीला. ॥४८॥
लिहिलें या मुद्रेंत व्यसनीं वत्सा ! बरें पहा, वाल;
तेंचि करीं; गुरुवचनीं विश्वास तुझा सदा रहावाच. ’ ॥४९॥
ऐसें सुतासि सांगुनि, देवुनियां कनकमुद्रिका आशी;
त्या शीलाढ्यासि पुसुनि, गेली जोडावया तपोराशी. ॥५०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP