मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|
परिवेदनदोषाचा निषेध

परिवेदनदोषाचा निषेध

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


कन्यादानासंबंधाने ‘ परिवेदन ’ नावाचा दोष होण्याचा संभव असतो. या दोषासंबंधाने मनूचे पुढील वचन प्रमाण मानण्यात येते :
परिवित्ति: परिवेत्ता यया च परिविंदति ।
सर्वे ते नरकं यान्ति दातृयाजकपंचमा: ॥
सख्खा वडील भाऊ अविवाहित असता धाकटा भाऊ विवाह करील तर हा दोष लागतो. विवाह करणार्‍या धाकट्या भावास ‘ परिवेत्ता ’ व अविवाहित राहिलेल्या वडील भावास ‘ परिवित्ति ’ अशा संज्ञा असून, परिवेदनविवाह घडला असता ( १ ) परिवित्ती, ( २ ) परिवेत्ता, ( ३ ) विवाहित होणारी वधू, ( ४ ) तिचे दान करणारा, व ( ५ ) विवाहाचा विधी चालविणारा उपाध्याय, अशी पाचही जणे या दोषामुळे नरकास जातात. अर्थात वरयोजना करिताना वरास वडील सख्खे भाऊ असल्यास त्यांचे विवाह झाले असल्याची खात्री अगोदर करून घ्यावी, व तशी खात्री झाली तरच वरास कन्या द्यावी, एरवी देऊ नये, हा या निषेधाचा तात्पर्यार्थ आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP