तात्पर्यरूपाने वराचे गुण
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
निरनिराळ्या ग्रंथकारांनी निरनिराळे गुण लिहिले आहेत, त्यांचे व्यवस्थित रीतीने वर्गीकरण केले असता वरपरीक्षेसंबंधाने पुढील गोष्टी पहाव्या असा अर्थनिष्कर्ष होतो.
( १ ) वर नपुसंक नसावा.
( २ ) त्याचे कुल चांगले असावा.
( ३ ) त्याचा स्वभाव चांगला असावा.
( ४ ) तो वयाने योग्य असावा, वृद्ध किंवा अशक्त असू नये.
( ५ ) तो कुरूप नसावा, व त्याची सर्व अंगे शाबूत असावी.
( ६ ) त्याची प्रकृती निरोगी असावी.
( ७ ) त्याचे वर्तन चांगले असावे, व त्याने उन्मत्तपणे वागू नये.
( ८ ) तो घरचा सधन असावा, व त्याच्या संसारास हातभार लावण्यास पिता, बंधू इत्यादी असावे.
( ९ ) त्यास बंधू अगर भगिनी असल्यास परिवेदन व समानक्रिया हे दोष घडण्याची भीती नसावी.
( १० ) तो बुद्धिमान व विद्वान असावा, - मूर्ख ठोंब्या नसावा.
( ११ ) तो धर्माने वागणारा असावा, धर्मबाह्य अगर बाटलेला नसावा.
( १२ ) त्याचे लक्ष संसारात असावे; अर्थात मोक्षमार्गाच्या किंवा निवृत्तिमार्गाच्या नादी लागलेला, अगर ज्ञानी अशा तर्हेचा तो नसावा.
( १३ ) तो दूर ठिकाणी राहणारा नसावा.
( १४ ) तो शूर म्हणजे शिपाई बाण्याचा नसावा.
( १५ ) त्याची लक्षणे चांगली असावी.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP