कर्तरीदोष
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
लग्नाच्या संधीस केव्हा केव्हा नाशकारक असे दोन पापग्रह येतात, त्यांपैकी द्वाद्शस्थानी असणारा ग्रह सरळमार्गी असून दुसरा द्वितीयस्थानाचा ग्रह वक्री असतो. अशा वेळी उत्पन्न होणार्या दोषास कर्तरी ( कातरी ) हे अन्वर्थक नाव असून तो वधूवरांचे कंठ खरोकरीच कातरणारा, अर्थात त्यांचा प्राणनाश करणारा होतो. या दोषाच्या वेळी या दोन पापग्रहांशिवायचे ग्रह एकूणएक सौम्य असले, तरी त्यांपैकी कोणाचेही या दोघांपुढे काही चालत नाही. हा कर्तरीदोष चंद्रासंबंधानेही पाहावा लागतो; कारण दोन पापग्रह दोहीकडेस राहून मध्ये लग्न किंगा चंद्र यांचे स्थान असले म्हनजे त्यापासून वधूवरांची दोघांची प्राणहानी न झाली तरी एकट्या वधूस या दोषाचा परिणाम भोगावा लागतो. हे पापग्रह स्पष्ट दिसणार्या ग्रहांपैकीच असले पाहिजेत असा नियम नसून ते राहुकेतूंच्या रूपाचे म्हणजे छायारूपी असले तरी ते आपला प्रभाव दाखवू शकतात.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP