मूत्र व रेत यांवरून पुरुषत्वपरीक्षा
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
पुरुषत्वाची परीक्षा करण्याच्या बाबतीत मिताक्षरादी निबंधग्रंथांतून नारदाचे पुढील वचन प्रमाण म्हणून वर्णिले आहे :
यस्याप्सु प्लवते बीजं र्हादि मूत्रं च फ़ेनिलं ।
पुमान्स्याल्लक्षणैरेतैर्विपरीतस्तु षंढक: ॥
अर्थ : ‘ पुरुषाचे रेत पाण्यावर पडले असता ते बुडून तळाशी जाईल, व मूत्रोत्सर्ग होताना त्याचा सळसळ आवाज होऊन मूत्रावर फ़ेसही येईल, तर त्या पुरुषाचे पुरुषत्व खरे समजावे; व तसे नसेल तर त्याची गणना नपुंसकात करावी. ’ - सामुद्रिक परीक्षेसंबंधाने वराहमिहिरकृत ‘ बृहत्संहिता ’ अ. ६८ याचे अवतरण पुढे परिरिष्ट ( ड ) येथे घेतले आहे, त्यांत पुरुषाचे लिंग, वृषण व मूत्र याबद्दलचे वर्णन पद्ये ६ - १६ यांत केले आहे, त्यांत मूत्रोत्सर्गाच्या आवाजाचे फ़ल शुभ वर्णिले असून रेतास निरनिराळ्या प्रकारचे वास येत असण्याची शुभाशुभ फ़ळेही सांगितली आहेत.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP