विवाहाचे आठ प्रकार
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
मागे प्रकरणांमध्ये वधूवरांचे जे गुणदोष सांगितले, त्यांचा उपयोग अर्वाचीन काळी एकाच प्रकारच्या विवाहाच्या कामी करण्यात येत आहे, व आजमितीस जेवढे म्हणून निबंधग्रंथ अथवा प्रयोगग्रंथ आढळतात, त्या सर्वांत नुसत्या ब्राह्मविवाहास उद्देशूनच सर्व लेख लिहिलेले असतात. तथापि प्राचीनकाळी विवाहाचे याहून अधिक म्हणजे आठ निरनिराळे प्रकार असत, ते प्रकारे येणेप्रमाणे :
ब्राह्मो दैवस्तथैवार्ष: प्राजापत्यस्तथासुर: ।
गान्धर्वो राक्षसश्चैव पैशाचश्चाष्टमोधम: ॥
हे वचन मनुस्मृती अ. ३ श्लोक २० येथे आले असून त्यात निर्दिष्ट केलेल्या प्रत्येक विवाहाचे लक्षण त्याच अध्यायात श्लोक २७ ते ३४ येथे पुढीलप्रमाणे सांगितले आहे :
१. आच्छाय चार्चयित्वा च श्रुतिशीलवते स्वयम् ॥
आहूय दानं कन्याया ब्राह्मो धर्म: प्रकीर्तित: ॥२७॥
२. यज्ञे तु वितते सम्यगृत्विजे कर्म कुर्वते ॥
अलंकृत्य सुतादानं दैवं धर्मे प्रचक्षते ॥२८॥
३. एकं गोमिथुनं द्वे वा वरादादाय धर्मय: ॥
कन्याप्रदान्म विधिवदार्षो धर्म: स उच्यते ॥२९॥
४. सहोभौ चरतां धर्ममिति वाचानुभाष्य च ॥
कन्याप्रदानमभ्यर्च्य प्राजापत्यो विधि: स्मृत: ॥३०॥
५. ज्ञातिभ्यो द्रविणं दत्वा कन्यायै चैव शक्तित: ॥
कन्याप्रदानं स्वाच्छंद्यादासुरो धर्म उच्यते ॥३१॥
६. इच्छयान्योन्यसंयोग: कन्यायाश्च वरस्य च ॥
गान्धर्व: स तु विज्ञेयो मैथुन्य: कामसंभव: ॥३२॥
७. हत्वा छित्त्वा च भित्त्वा च क्रोशंतीं रुदतीं गृहात् ॥
प्रसह्य कन्याहरणं राक्षसो विधिरुच्यते ॥३३॥
८. सुप्तां मत्तां प्रमत्तां वा रहो यत्रोपगच्छति ॥
स पापिष्ठो विवाहानां पैशाच: प्रथितोधम: ॥३४॥
प्रत्येक विवाहाचे स्वरूप खालील वर्णनावरून स्पष्ट दिसेल व यासाठी वचनांचे निराळे भाषान्तर करण्याची जरूर नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP