मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|विवाहाचे आठ प्रकार|
आर्ष विवाह

आर्ष विवाह

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


तिसर्‍या प्रकारच्या विवाहास ‘ आर्षविवाह ’ ही संज्ञा असून तोही ब्राह्मणवर्णापुरताच उक्त असल्याचे मानिले आहे. पहिल्या दोन विवाहांपेक्षा या विवाहाची योग्यता कमी आहे; कारण केवळ धर्मकृत्यास मदत किंवा असेच काही स्वरूप मनात आणून कन्येचा पिता वरापासून गाय व बैल यांचे एक जोडपे अगर दोन जोडपी घेतो, व त्यांस आपली कन्या देतो. प्राचीन काळी ऋषिवर्गात अशा प्रकारे विवाह करन्याची चाल होती, असे मनुस्मृतीवरील राघवानंदी टीकेत लिहिले आहे. वरापासून गाई इत्यादिकांच्या रूपाने द्रव्य घेऊन कन्या द्यावयाची याचा अर्थ ‘ कन्याविक्रय ’ असा होतो, परंतु तो तसा मानू नये, कारण त्याचा हेतू धर्मक्रियेपुरता आहे, असे या विवाहाचे कित्येक टीकाकारांनी मंडन केले आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP