गांधर्वविवाह
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
पुढच्या प्रकारास ‘ गांधर्वविवाह ’ म्हणतात, व आसुरविवाहाप्रमाणेच तो सर्व वर्णांच्या लोकांस करिता येतो. या विवाहास स्त्रीपुरुषांची मने मिळाली की प्रत्यक्ष विवाहाचा विधी होण्यापूर्वीच उभयमागाहून रीतीप्रमाणे विवाहाची सर्व कृत्ये यथाविधी केली पाहिजेत असे निबंधकारांनी सामान्यत: ठरविले आहे. प्राचीन काळी क्षत्रियवर्गात या प्रकारचे विवाह झाल्याची उदाहरणे पुराण व इतिहास ग्रंथांत पुष्कळ वर्णिली आहेत. दुष्यंत - शकुंतलाविवाह याच प्रकाराचे उदाहरण असल्याचे प्रसिद्धच आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP