पृथग्विवाह आणि मिश्रविवाह
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
केव्हा केव्हा विवाहकर्त्याचा मूळ उद्देश एक प्रकारच्या विवाहाचाच असतो, तथापि प्रसंगाने काही विशेष बनाव बनून आल्यामुळे त्या विवाहास एकंदरीत काही विशेष बनाव बनून आल्यामुळे त्या विवाहस एकंदरीत काही तरी निराळेच स्वरूप येते; या दृष्टीने पाहू जाता, विवाहांचे ( १ ) पृथक् ( निराळे अथवा एकेरी ), व ( २ ) मिश्र ( मिसळलेले ) असे दोन वर्ग पाडिता येतील, ‘ पृथक् ’ या अर्थी ‘ केवल ’ अथवा ‘ असंकीर्ण ’, व ‘ मिश्र ’ या अर्थी ‘ संकीर्ण ’ असेही पर्यायशब्द योजिलेले आढळतात. दुष्यंतराजाचा शकुंतलेशी झालेला विवाह हा ‘ केवलगांधर्व ’ होय. त्याचप्रमाणे विचित्रवीर्याने अंबिकेस वरिले हाही ‘ केवलराक्षस ’ विवाह होय. रुक्मिणीचा विवाह कृष्णाशी झाला हे ‘ मिश्रविवाहा ’ चे उदाहरण आहे; परंतु रुक्मिणीच्या बंधूने तो कबूल केला नाही यामुळे युद्धाचा प्रसंग येऊन कृष्णास त्या बंधूस ठार मारण्याची पाळी आली, व अशा रीतीने तेवढ्यापुरता तो राक्षसविवाह झाला असे म्हणावे लागते. अर्जुन आणि सुभद्रा यांचा विवाह असाच गंधर्व व राक्षस या विवाहाचे मिश्रण आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP