षड्विंशति छंदनामें.
युक्ता १, अयुक्ता २, मध्यमा ३, प्रतिष्ठा ४, सुप्रतिष्ठा ५, गायत्री ६, उष्णिक ७, अनुष्टुप् ८, बृहती ९, पंक्ति १०, त्रिष्टुप् ११, जगती १२, अतिजगती १३, शक्करी १४, अतिशक्करी १५, अष्टी १६, अत्यष्टी १७, धृति १८, अतिधृति १९, कृति २०, प्रकृति २१, आकृति २२, विकृति २३, संस्कृति २४, अभिकृति २५, उत्कृति २६.
सुप्रतिष्ठा -- ५
पंक्ति.
गण - भ, ग, ग.
पंक्तिसुनामें । गाजत नेमें. । भोगवती हे । सत्प्रिय आहे. ॥२९॥
प्रीति.
गण - र, ग, ग.
र्गौगा योजी तूं; । प्रीति पावें तूं. । पंडिता देते । तोष सर्वांतें. ॥३०॥
गायत्री -- ६
वसुधा.
गण - स, स.
स युगी वसुधा । रमवी वसुधा. । सुरलोकसुधा । करि साच मुधा. ॥३१॥
शशिवदना.
गण - न, य.
न य युत आहे । शशिवदना हे; । म्हणुनि इचा तूं । धरिं बहु हेतू. ॥३२॥
मातंगी.
गण - म, म.
मा दोनी ये योजा । मातंगी हे वोजा.
भावें पूजा ईतें, । देते सर्वार्थातें. ॥३३॥