अष्टि

निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.


वाणिनी.
गण - न, ज, भ, ज, र, ग.
न ज भ ज रीं ग युक्त सति वाणिनी भजावी.
वसु वसु बिल्व वाहुनि यतीश्वरीं पुजावी.
नियतमनें बरी हृदयिं आणिजे भवानी.
मग न घडेल साच जनिं मृत्यु या भवानी. ॥६॥
चामरी.
गण - ज, र, ज, र, ज, ग.
लघू गुरू निरंतरीं प्रयोजिं वृत्त चामरी,
तदा नरेंद्र वीजितील रत्नदंडचामरीं.
प्रकामदा घडेल तूज भारती यशस्करी
गुणाढ्य सर्व भूसुरांत शोभशी बुधां शिरीं. ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP