अतिजगती

निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.


क्षमा.
गण - न, न, त, त, ग.
यति - ७, ६.
न न त त गुरुची ते बुझावी क्षमा । हयरसयतिची हे गुणाद्या रमा.
अभिमत फळ दे जे अमित्रांतका । परगति शुभधी महप्राकाशिका. ॥८५॥
प्रहर्षिणी.
गण - म, न, ज, र, ग.
यति - ३, १०.
मा ना जीं र गुरुयुता प्रहर्षिणी हे
जाणावी त्रिदशयती सुहर्षिणी हे.
योजावी गणगुरुयुक्त पद्यकामीं.
पावावी अमित सुकीर्ति याच भूमी. ॥८६॥
रुचिरा.
गण - ज, भ, स, र, ग.
यति - ४, ९.
ज भा स रा गुरु, रुचिरा योजि आतां.
सुधाब्धिशीं ग्रहयति जाणोनि घेतां.
घडे सुखें न करुनियां त्वां प्रबंधा.
नृपांगणीं यश जय पावे सुबुद्धा. ॥८७॥
उर्वशी.
गण - न, त, त, त, ग.
न त त ता गीं सुखाची घडे उर्वशी.
कठिण यज्ञादि कर्में मिळे उर्वशी.
जरि तिचां भोगकामीं तुला आवडी
विहितमार्गेंचि नेयीं घडीनें घडी. ॥८८॥
चंचरीकावली.
गण - य, म, र, र, ग.
यति - ६, ७.
य मीं रा रां गां हीं चंचरीकावली हे.
यती षट्कीं, लोकीं योजितां सौख्य लाहे.
हृदंभोजस्थानीं सर्वदा ठेविं यीतें.
इचा नादें होशी थोर संतुष्ट चित्तें. ॥८९॥
मत्तमयूर.
गण - म, त, य, स, ग.
यति - ४, ९.
मा ता यां सीं योजिं गुरू मत्तमयूरी.
वेंदी, रंध्रीं विश्रम जाणें सुखकारी.
याची आहे आवडि सर्वां सगुणांतें;
वृत्तांमध्यें रंजविता हाचि मनातें. ॥९०॥
मत्तहासिनी.
गण - ज, त, स, ज, ग.
यति - ५, ८.
ज तीं स जा गीं घडत मत्तहासिनी.
यती शराष्टीं विमल योजिं सद्गुणीं.
करी मना हे कुतुक फार चातुरां.
विराजिता हे नटवधूंत हे धुरा. ॥९१॥
मंजुभाषिणी.
गण - स, ज, स, ज, ग.
यति - ५, ८.
स ज सा ज गीं रचिशि मंजुभाषिणी,
सरसानना, शरवसू मंजुभाषिणी,
सरसानना, शरवसू अपेक्षिणी.
वसते मनीं जरि इचां सुखीं स्पृहा,
द्रविणें करीं वश विलासिनी महा. ॥९२॥
चंद्रिका.
गण - न, न, त, र, ग.
यति - ८, ५.
न न त र गुरुवर्ण सुचंद्रिका हे.
विकसवि कविचित्ता प्रकाशिनी हे.
समजशि यति वेदद्वयें, शरानें.
अति सुखमय सेवीं प्रियेशिं मानें. ॥९३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP