उदिष्ट
निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.
उदिष्ट तें वृत्त वर्णीं द्विगुणांक लिहोनियां.
अंका मेळविजे सर्व लघुस्थानीं असेति जे. ॥४५॥
त्यांतही मेळवीं येक गणोनि कथिजे तदा,
कितवा वृत्त हा आहे, चतुरीं पुसतां तुला. ॥४६॥
प्रत्यय त्रय हे ऐसे बुद्धी जाणोनि योजिजे;
सभास्थानीं जिणे सर्वां विदग्धकुलमडण ॥४७॥
श्लोकसंख्यासार्धशतें आमूलाग्र अनुक्रमें
मुक्तावळी छंद सूत्रें वोंविली हे निरंजनें. ॥४८॥
श्रीमन्माधवपंडितेंद्रतनुजें सद्वृत्तमुक्तावळी
नानाछंदसमुद्रसंभवमणी वेचोनियां ( गुंफिली );
ते आणोनि समर्पिली बुधजनालंकार संतां पदीं,
साधु, श्रेष्ठ, महानुभाव, चतुरां हो मान्य ऐशा विधी. ॥४९॥
सोळाशें त्र्यशिती शकीं, वृषमहासंवत्सरारभकीं,
चैत्रींचां प्रथमा दिनीं, प्रतिपदीं, वारीं शशीनामकीं.
झाला ग्रंथ समाप्त राघवकृपापांगें बनाजीमुखें
बालांलागिं सुबोध पद्यरचना लोकीं घडाया सुखें. ॥१५०॥
इतिश्रीमत्कविकुलतिलकबनाजीमाधवनिरंजनविरचिता सद्वृत्तमुक्तावली समाप्ता.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP