अर्धसमवृत्तप्रकरणम्

निरंजन माधव लिखित सद्वृत्तमुक्तावली.


वियोगिनी.
चरण १ व ३. अक्षरें १०. गण - स, स, ज, ग.
चरण २ व ४. अक्षरें ११. गण - स, भ, र, ल, ग.
विषमीं स स जा गुरू; समीं । स भ रांतीं ल गुरू वियोगिनी.
कवि योजिति या गणक्रमीं, । तरि ते पावति मान सत्तमीं. ॥३३॥
वेगवती.
चरण १ व ३. अक्षरें १०. गण - स, स, स, ग.
चरण २ व ४. अक्षरें ११. गण - भ, भ, भ, ग, ग.
स गणत्रय गा विषमांतीं, । साम्यपदीं भ भ भा ग ग येती;
तरि वेगवती शुभनामा; । जाणुनियां रचि सत्कवि नेमा. ॥३४॥
श्रुतमध्या.
चरण १ व ३. अक्षरें ११. गण - भ, भ, भ, ग, ग.
चरण २ व ४. अक्षरें १२. गण - न, ज, ज, य.
भ त्रय तें विषमीं गुरुयुग्मीं, । समपद ना ज ज यीं श्रुतमध्या
योजुनि या रिति वृत्त गणावा । चतुर, सुधी सकळांत म्हणावा. ॥३५॥
माल्यभारा.
चरण १ व ३. अक्षरें ११. गण - स, स, ज, ग, ग.
चरण २ व ४. अक्षरें १२. गण - स, भ, र, य.
विषमीं स स जा ग दोनि अंतीं, । समाभागीं स भ रा य माल्यभारा.
करिं वृत्त असाचि पुण्यशीला, । तरि तैं साच घडे प्रभातवेळा. ॥३६॥
पुष्पिताग्रा.
चरण १ व ३. अक्षरें १२. गण - न, न, र, य.
चरण २ व ४. अक्षरें १३. गण - न, ज, ज, र, ग.
न युग र विषमीं तसें य कारा. । समपद ना ज ज रा ग पुष्पिताग्रा.
गणुनि गण असे रचील वाणी । तरि पद पावल तो महासुजाणीं. ॥३७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP