ग्रंथार्पण पत्रिका
श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥
कृष्ण माझा गुरु कृष्ण माझें तारूं । उतरी पैलपारू भवनदी ॥२॥
कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसांवा । वाटे न करावा परता जीवा ॥४॥
पद - ( राग - भैरवी, ताल - त्रिताल )
( चाल - या विरहा कां भीसी )
तोषविलें गुरुनाथा ॥ नृपाला ॥ तोषविलें गुरुनाथा ॥ध्रु० ॥
तनु मन धन अर्पुनि गुरुसेवा, केली त्वां निभ्रांता ॥तोष०॥१॥
शीलनाथ गुरुकृपाप्रसादें, सहज वदसि वेदांता ॥तोष०॥२॥
उदासीन वैरागि दिससि तूं, कितितरि प्रेमळ नाथा ॥तोष०॥३॥
स्वधर्मनिष्ठा धरिसि वरिष्ठा, व्रताचरणिं तत्परता ॥तोष०॥४॥
कमलजलापरि वरुनि प्रपंचा, साधिसि तूं परमार्था ॥तोष०॥५॥
अतिताभ्यागत बहु आवडिनें, तृप्त करीशि समर्था ॥तोष०॥६॥
सद्गुणमंडित मल्हार नृपती, आवड तुज एकांता ॥तोष०॥७॥
प्राणप्रिय तूं प्रजाजनांचा, होसि तयांचा दाता ॥तोष०॥८॥
परिचयिं अपुल्या अनुभव मजला, नाहीं वद वदंता ॥तोष०॥९॥
खास खास अधिकारि अससि तूं, हें जाणुनियां आतां ॥तोष०॥१०॥
अर्पितसें तुज प्रेमभरें ही, मम सद्गुरुकृत कविता ॥तोष०॥११॥
स्वीकारुनि कृतकृत्य करीं या, कृष्ण जगन्नाथा ॥तोष०॥१२॥
श्रीमंतांचा नम्र बंधु,
कृष्ण जगन्नाथ थळी.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP