मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्रीमुकुंदराज

श्रीमुकुंदराज

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


मुकुंदराजा तूं प्रिया माझा । लावि देह तूझा राम भक्तीकाजा ॥धृ०॥
नवविधाभक्ती करिं राघवाची । राम सन्मुख नित्य दासबोध वाची ॥मु०॥१॥
विवरुनी अर्था साधिं परमार्था । निशिदिनी भज तूं राम समर्था ॥मु०॥२॥
तुझे आई बाप राम सीतापती । ओळख घे त्यांची साधुंचे संगतीं ॥मु०॥३॥
तरिच जन्माचा होइल उद्धार । विष्णु कृष्ण जगन्नाथा आवडसी फार ॥मुकुंदराजा तूं प्रिया माझा॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP