मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
उपदेशपर पद

उपदेशपर पद

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


सुखा साठीं बा कां रे विषयीं तळमळसी तूं भारीं । माझे माझे घरवाडे दारा पोरें कवळुनि सारीं । रात्र दिवस श्रमुनियां तूं संसारीं ॥धृ०॥
धन दौलतिचे जन दिसती जरि तुज भाग्यवंत कोटी । तरि त्या नाहीं सुख कांहीं तिळभरि अंतरिं चिंता मोठी । सर्व सुख कांहीं तिळभरि अंतरिं चिंता मोठी । सर्व सूख आहे आत्मस्वरूपीं निर्धारीं ॥सु०॥१॥
जें तुज दिसतें तें सोडुनि अलक्ष आपण लक्षीं विचारीं । वृत्ति विरामें जें स्फुरतें सुख तें अनुभविं निरहकारीं । राम विष्णु कृष्ण जगन्नाथ स्मर आनंद कारी ॥सु०॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP