मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्रीजगदंबेचीं पदें

श्रीजगदंबेचीं पदें

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


पद १ लें -
जनक जगदंब सीताराम देइल अखंड सुखआराम ॥धृ०॥
विश्व सकळ आनंदमय असा अनुभव मेघश्याम ॥दे०॥१॥
संत साधु सद्भक्त मेळवुनी आत्मभजनीं विश्राम ॥दे०॥२॥
पुत्र मित्र धन कलत्र या मधीं करुनि मला निष्काम ॥दे०॥३॥
भजन पुजन सत्पुराण कीर्तन श्रवण पुरवुनी काम ॥दे०॥४॥
अपार सज्जन कृपाश्रयें प्रभु दावुनी विपद विराम ॥दे०॥५॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ असें सदैव जपतां नाम ॥दे जनक जगदंब सीताराम, देइल अखंड सुखआराम॥६॥

पद २ रें -
जगदंब जगदंब दावि मज पाय तुझे अविलंब ॥दा०॥धृ०॥
माय माझीं तूं नायकसी अजुनी लाविसी काय विलंब ॥दा०॥१॥
जाय विनाशत काय ह्मणुनि तुज, गाय धरुनि न विसंब ॥दा०॥२॥
मिळवुनियां सद्भक्त साधु करी, भजनोत्साहारंभ ॥दा०॥३॥
आनंदमयीं आनंदास्तव, आणुनि भक्त कदंब ॥दा०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ घरीं, सदैव निज अवलंब ॥दावि मज पाय तुझे अविलंब॥५॥

पद ३ रें -
कनक कमळीं तुझी पुजा करिन मी अष्टांगीं साष्टांगीं पदरजीं नमीन मी ॥क० द० धृ०॥
अखंड ऐश्वर्यें आपुल्या कांहिंना मला कमी ॥क०॥१॥
जनक जननी नांदसि तूं निजानंदाश्रमी ॥क०॥२॥
अद्वयब्रह्मानंदरूपा भेटली पराक्रमी ॥क०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा सर्वदा पराक्रमीं ॥कनक कमळीं तुझी पुजा करिन मी अष्टांगीं सष्टांगीं॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP