मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्री जगन्नाथ बोवा बोरीकर

श्री जगन्नाथ बोवा बोरीकर

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


धन्य धन्य अवतारचि केवळ जगन्नाथ दासाचा । ज्ञानभक्तिवैराग्यविराजित जगदोद्धारक साचा ॥धृ०॥
पतित पावन व्हाया देशोदेशीं वास जयांचा । जिकडे तिकडे थाट चालविति कीर्तन सप्ताहांचा ॥ध०॥१॥
निरहंकारी प्रेमळ भारी स्वभाव शांत मनाचा । इंद्रियनिग्रह बळकट जैसा परिसों योगि शुकाचा ॥ध०॥२॥
नरनारी आबालवृद्ध यां जिवलग होय जिवाचा । निंदास्तुति सम अद्वय भावें भोक्ता भजनसुखाचा ॥ध०॥३॥
कोणी कांहिं म्हणो आवडता कृष्णजगन्नाथचा । भला भला सत्पुरुष लाभला पुतळा भक्तिरसाचा ॥ध०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP