पांच अक्षरी वृत्तें - सुप्रतिष्ठा
कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.
पंक्ति -
( भ्ग्गाविति पंक्ति: ) : - भागगनीं ती । जाणचि पंक्ति ।
भास्वर आहे । कीं दिसताहे । ही प्रमदाची । पंक्ति रदांची ॥७॥
शेवतिखाली । तो वनमाली । सांगुनि युक्ति । बैसवि पंक्ति ॥८॥
राघवकांता । जाहलि सीता । सांग कथा ते । पंक्तिरथातें ॥९॥
==
सती -
( नगि सती ) : - नगगणीं । सति म्हणी ।
समतुला । शशिकला । समजती । प्रियसती ।
बुधवरा । मनिं धरा । हरिहरा । भव तरा ॥१०॥
यति विच्छेदोदाहरणम् --
तुझ्या पदाब्जी मनभृंग नारा - ।
यणा असों दे यदुनाथ धारा - ॥
धरामीत्वण्मधुसूदना वा - ।
मना दयासिंधु सदैव देवा ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : March 02, 2018
TOP