अकरा अक्षरी वृत्तें - त्रिष्टुप्

कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.


उपजाति: -
आनन्तरोदीरितलक्ष्मभाजौ ।
पादौ यदीयवुपजातयस्ता: ॥
“ ती इंद्रवज्रा जरी हो कवींनी ।
उपेंद्रवज्रागतपाद यांनीं ॥
केली विमिश्रा उपजाति तीला ।
म्हणा तसें अन्यहि मिश्रणाला ॥
राधाधरक्रान्तिमुखासमान ।
व्हावा सुधानागविधूस मान ॥
घडॆल वाटे परि युक्ति घे ही ।
पुन्हा समुद्रीं उपजा तिघेही ॥५४॥
ते पाहती बाहुज चाप भारी ।
जनांस तें राम जयीं उभारी ॥
न राहती पाहति जाति कांही ।
ग्रामस्थ जाती उपजाति कांहीं ॥५५॥
श्वफल्‍ कंपुत्रे अणिला तयासी ।
कंसाचिया जो न धरी भयासी ।
तो पाहती हो नरबायकांही ।
विप्रादिजाती उपजाति कांहीं ॥५६॥
==
दोधक : -
( दोधकवृत्तमिदम्‍ भभभाद्रौ ) : - दोधकवृत्तभभाभगगांनी ।
भाविक भक्तसभेप्रति येतो ।
धर्म वदे हित ऐकुनि घेतो ॥
कांहिं मिषें हरितो जनवित्ता ।
दोधक तो नृप गोड न चिता ॥५७॥
भूपतिभूहर भीषण लोका ।
द्रव्य हरी बहु दाखवि शोका ॥
साधुजना बहु लाविती धाका ।
यापरिचा नर दोधक टाका ॥५८॥
==
शालिनी : -
( शालिन्युक्ता म्तौ तगौ गोऽ ब्धिलोकै: ) -
मातातागागांनिं ती शालिनी हो ।
माझ्या चित्ता वाटतें नित्य जावें ।
साधूपाशीं वैष्णवातें भजावें ॥
राहावेंही सर्वदा साधुगांवी ।
श्रीकृष्णाची शालिनी कीर्ति गावी ॥५९॥
मारी दैत्यां तारितो भक्त लोकां ।
द्रव्यें देतो वारितो सर्व शोकां ॥
रक्षी आम्हां काननीं आणि गांवी ।
त्या कृष्णाची शालिनी कीर्ति गावी ॥६०॥
माते देतो मान्यता सर्व लोकीं ।
दीनां भक्तां जो दयेनें विलोकी ।
युक्तीनें जो दुष्टलोकां दगावी ।
त्या कृष्णाची शालिनी कीर्ति गावी ॥६१॥
मानें होतो तोषतो भामिनीतें ।
संगाकृत्या प्रद्रवें कामिनी तें ॥
सैन्याधिक्यें शोभती फार राजे ।
तैसी क्षेत्री शालि नीरे विराजे ॥६२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP