बारा अक्षरी वृत्तें - जगती
कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.
वैश्वदेवी: -
( पञ्चाश्वैच्छिन्ना वैश्वंदेवी ममौ यौ )
मामायायांनी वैश्वदेवी घडे ती ॥
मेल्या कामातें काय देतो यशस्वी ।
ज्याला प्रीतीनें आवडे तो मनस्वी ॥
त्रैलोक्याचा स्वामी करी व्दारका ही ।
लोकाचारानें वैश्वदेवी क्रियाही ॥९५॥
==
नवमालिनी : -
( इह नवमालिका नजभयै: स्यात् ) :
बघ नवमालिनी नजभयीं ती
न धरि जनाचि भीड भय नाहीं ।
नदितटि जाउनी युवति पाही ॥
व्रजिं बहु घेतसे सुरतलाहो ।
हरि नवमालिनीसि रमला हो ॥९६॥
नमुनि जयाशि भूरिभय नाशी ।
स्मरुनि सदैव तोषवि मनाशीं ॥
निजजनकाम पूरवि हरी तो ।
वनिं नव मालिनीसचि धरीतो ॥९७॥
प्रहर्षणी : -
( म्नौ ज्रौ गस्त्रिदशयति: प्रहर्षणीयम् ) : -
मानावी मनजरगीं प्रहर्षणी ती ।
मोठें तें नयन जरी हरी पहाती ।
ते साधू खलजनशब्द ते सहाती ॥
वाणी वर्णिल जीरअ सच्छिरोमणीतें ।
जाणावी त्रिदशयतिप्रहर्षणी ते ॥९८॥
मातें तो नृहरि जसा बरा तसाच ।
वाटेना इतर सुरेश हेंच साच ।
कोपिष्ठा नहि पयसिध्दता उणीही ।
बाळातें जननि तरी प्रहर्षणी ही ॥९९॥
मांडे पानक सजुरी शिरा करंजी ।
पोळया बेसन घृत दुग्ध खंड भाजी ॥
लडू तें तिखट चरु दहीं भरीतें ।
हो भुक्ति बहु वरि विप्रहर्षणीतें ॥१००॥
==
रुचिरा: -
( चतुर्ग्रहैरतिरुचिरा जभस्जगा: ) : -
जभासजागनिं रुचिरा म्हणा सदा ।
जया सभा बहुसदनें जशी तशी ।
गजा हृयास ग गणना गुरें म्हशी ॥
जगांत तो सुखधनयुक्त तो तरी ।
भलीच कामिनि रुचिरा असे जरी ॥१०१॥
==
मत्तमयूरा : -
( वेदैरंध्रैर्म्तौ यसगा मत्तमयूरम् ) : -
मातायासार्गी घडते मत्तमयूरा ।
मातें काता सांडियलें या समयाशीं ।
मारी बाणा काम शकें जिंकुं न याशी ।
हाका मारी जाणुनि केल्या अपराधा ।
कुंजामध्यें मत्तमयूरापरि राधा ॥१०२॥
मातें खातो नक्रयम त्रास महा हा ।
होतो कृष्णा सोडविं वेगें मज हा हा ॥
दीनोंव्दारा धरिसि आतां परिकें कां ।
मातंगाची मत्तमयूरापरि केका ॥१०३॥
माता भ्राता तूं भय नाशी सखया जी ।
गेले स्नाना विप्र तयां अन्न न भाजी ॥
आतां देती शाप सहसी वनिं कृष्णा ।
हाका मारी मत्तमयूरापरि कृष्णा ॥१०४॥
माझे कांते हें वय जातें सखये गे ।
सीते सीते निष्ठुरता टाकुनि ये गे ॥
कोठें गेली सांग नगा नाहिं अराम ।
शोकें बोले मत्तमयूरापरि राम ॥१०५॥
मारायातें धाडियले या सकलांसी ।
मातें द्याया वन्हिविषें पात गळासी ॥
श्रीज्ञा धावें वाचविं येथें निरवाणी ।
प्रल्हादाची मत्तमयूरासम वाणी ॥१०६॥
मातेनें तो ताडियलें वा समयासी ।
होता तोही निर्दय माया न तयासी ।
ऐसें देवातें ध्रुव आडें स्थळमार्गे ।
दु:खें रानीं मत्तमयूराहुनि रागें ॥१०७॥
मोजीना तो निर्भय मारी सकळांसी ।
अस्मच्छत्रू रावण दावी स्वबलासी ॥
सौमित्नि हा व्याकुळ कीं मारुति यासी ।
दे तोषातें मत्तमयूरा घन होसी ॥१०८॥
N/A
References : N/A
Last Updated : March 02, 2018
TOP