चार अक्षरी वृत्तें - प्रतिष्ठा
कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.
वसंततिलका ( सिंहोन्नता ) : -
( सिंहोन्नतेयमुदिता मुनिकाश्यपेन ) : -
सिंहोन्नता वदिली ती मुनि काश्यपांनी ।
ताटक भूषण जिला न जरी तरी ती ।
पाहूनियाच हरिच्याहि मना हरीती ॥
जीचा नितंब उर थोर कृशत्व माजी ।
सिंहोन्नता दिसतसे युवतीसमाजी ॥११४॥
तुष्टो न भीति तिजला ब्रजयोषितांत ।
तोतें सुखें रमवि नित्य विरंचितात ॥
राधा सुरद्रुमलताफळ येर पाला ।
सिंहोन्नता म्हणुनि भासलि काश्यपाला ॥११५॥
==
वसन्ततिलका ( उध्दर्षिणी ) :
( उध्दर्षिणीयमुदिता मुनिसैतवेन ): -
उध्दर्षिणी कथिलि ती मुनिसैतवांनीं ।
ती त्या विभूसि भजतां रजनी पुरेना ।
कामाग्रिची लहरि थोर अली सरेना ।
ऐसें व्रजीं सुख दुजीस न हेहि मानी ।
उध्दर्षिंणी म्हणति देव तिला विमानीं ॥११६॥
श्रृंगार सव करुनी वृषभानु कन्या ।
सौंदर्यसद्गुणयुता युवतींत धन्या ॥
कृष्णार्थ जाउनि बरी करि कुंजवास ।
उध्दर्षिणी दिसलि त्या मुनिसैतवासे ॥११७॥
==
चंद्रावर्ता इयमेवशशिकला : -
( व्दिहतहयलघुरथ गिति शशिकला ): -
ननननसिं घडल खचित शशिकला ।
निशिं दिनिं भजन करिन परिस तरी ।
तुजविण कवण मज अडवल तरी ॥
सुतनुनयनमुखकुच भुलवि मला ।
प्रतिदिवशिं जशि उगवति शशिकला ॥११८॥
चंद्रावर्तोदाहरणं न दर्शितं तदर्थमार्येयम् ।
अपवाहक आणि चंद्रावर्ता हें नाम तद्गणी न घडे ।
यास्तव या नामाचे श्लोक करुनी न दाविले उघडे ॥११९॥
==
मणिगुणनिकर: -
( वसुहयरतिरिह मणिगुणानिकर : ) : -
वसुहयतिं गणि मणिगुणनिकरा ।
निज जन भजन कधिं मनिं ( नमि ) विसर ना ।
हरि सुरवरवनिं सह नव ललना ॥
निरखि नयनिं सखि तिसि रमत बरा ।
हृदयिं धरि कनकमणिगुणनिकरा ॥१२०॥
==
मालिनी: -
( ननमयययुतेयं मालिनी भोगिलोकै: ):
ननमयगणांनी होतसे मालिनी ती ।
नयनिं निरखि माला होय जो कायधारी ।
निज जन सुखकारी कंसदासी सुधारी ॥
सहज निरसि ज्याचें नाम सर्वाघराशी ।
मधुपुरिंत अला तो मालिनाच्या घराशीं ॥१२१॥
नमिति निखिल मोठे राय ते पाय ज्याचे ।
मिरविति सुर माथा पुंज की तद्रजांचे ।
म्हणुनि पुजुं अतां त्या राधिकामेधनीला ।
बहु परिमलपुष्पें मागती मालिनीला ॥१२२॥
निधुवनिं सुख मोठें त्या यदूनायकातें ।
म्हणुनि मुरलिनादें आणवी गोपिकातें ।
उशिर किमपि होता जेविं वृक्षास भोगी ।
कवळुनि वनिं तैसा मालिनीलाच भोगी ॥१२३॥
नयनिं नळ उभेचा काय तो होय अर्धा ।
चरणिं हरि तयाचे नित्य ठेवोनि मूर्धा ॥
दशशतकमलांनी पूजितां त्या प्रवाही ।
नयनचि जग व्यापी मालि नीलब्ज वाही ॥१२४॥
निजति न धरिं मार्गीं बायका पायरीच्या ।
जवाळे बसुनि माला गुंफिती मंजरीच्या ॥
शतद्लकुसुमांच्या त्याहि नानापरीच्या ।
बहुत कुशल ऐशा मालिनी पंढरीच्या ॥१२५॥
निशित निघुनि मौनें पाय चिंती यदूचे ।
सकलहि गुण गाती गोकुळीं फार तीचे ।
शिकवि मधुर वाक्यें श्रीपती दूतिकेशी ॥
प्रियसखि अण मुक्तामालिनी राधिकेशीं ॥१२६॥
“ निजुनि निरखि मी ते माय जीची यशोदा ।
कुवलयद्लनीला जे स्वभृत्या यशोदा ॥
हळुच जवळि आली पाहिली नाहिं धूर्तीं ।
तुळसिकमलजातीमालिनी कृष्णमूर्ती ॥१२७॥
N/A
References : N/A
Last Updated : March 02, 2018
TOP