अकरा अक्षरी वृत्तें - त्रिष्टुप्
कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.
वातोर्मी : -
( वातोर्मीयं कथिता म्भौ तगौ ग: ) : -
वातोर्मी ती मभतागाग यांनी ।
मोठी शोभा दिसते चांदण्याची ।
स्वारी येना अजुनी का धन्याची ॥
जातीमल्लीसुमनानीरजाची ।
वातोर्मी हे मजला फार जाची ॥६३॥
मुद्रा लोभी पति तोही प्रवासी ।
जो येण्याला किति वंदूं शिवासी ।
भोगायाची मति गेली तयाची ।
वातोर्मी ये सुमना तूं न जाची ॥६४॥
मानी रंभाधिक तो ज्या स्त्रियांसी ।
त्या येती हे कथना ये तयासी ॥
सांगे वार्ता वदनोद्भूत याचे ।
वातोर्मीनें श्रम गेले तयाचे ॥६५॥
==
भ्रमरविलसितम् : -
( म्भौ न्लौ ग : भ्रमरविलसितम् ): -
माम्भनालागी भ्रमरविल्सितम् ।
मुद्रा शोभे सुकनकघटिता ।
कंठीं माला मणिमय रचिता ॥
मूर्धा भासे कचमर असितें ।
पाहा जैशी भ्रमर - विलसितें ॥६६॥
माथा रंभा सुमन असित तें ।
कंठीं लावी मृगमद नुसतें ।
आस्या झांकी कचभर पुरतें ॥
जैसें पद्म भ्रमरविलसितें ॥६७॥
==
रथोध्दता :
( रान्नराविह रथोध्दता लगौ ): - रानरालगिं घडे रथोध्दता ।
राग मान विसरे रडे बरी ।
कुंडिनेशसुत बांधल्यावरी ॥
तव्दिहीन पृतना न साजरी ।
वाजिवारणरथोध्दता जरी ॥६८॥
राक्षसी नगरि रामसेवकें ।
जाळिली बहुत पुच्छपावकें ।
धाडि रावण करोनि सिध्दता ।
त्या चंमूहि वधिल्या रथोध्दता ॥६९॥
N/A
References : N/A
Last Updated : March 02, 2018
TOP