सतरा अक्षरी वृत्ते - अत्यष्टि

कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.


हरिणी:
( रसयुगहयैर्न्सौ स्लौ गो यदा हरिणी तदा ) : -
नसमरसलागांनी जाणा घडे हरिणी सदा ।
नय विसरला मातें जो रानिं या सरितातटी ।
बसुनि शरचापातें ( पाही ) हणील दिसे हटी ॥
स्वगण न दिसे कोठें जावें असें न तिला कळे ।
न धरुनि भया त्यातें टाकोनि ती हरिणी पळे ॥१२९॥
पृथ्वी : ( जसौ जसयलावुसुग्रहयतिश्च पृथ्वी गुरु: ) : -
जसाजसयलांनिं ही घडतसेचि पृथ्वी पहा ।
जनांस समजे जरी वसतिला यशोदे घरीं ।
खराच हरि हा अला असुर मर्दनाला परी ॥
व्रजांत नरनारिला बहुत हर्ष झाला असे ।
धनें बहुत गोधनें करुन युक्त पृथ्वी दिसे ॥१३०॥
==
वंशपत्रपतितम्‍ : -
( दिड्‍ मुनिवंशपत्रपतितं भरनभैर्नलगै: ) : -
होइ भारनभानागिं वंह्सपत्रपतित तें ।
भारति राजसी निपुण भामिनी नयन जशी ।
भाविक मोहिनी सरसयुक्त ही भुलवि तसी ॥
मेघजवृष्टि हस्तजनित जरि जहलि नसे ।
शेवटिं जाहली विफल वंशपत्र पतितसें ॥१३१॥
==
मंदाक्रान्ता : -
( मंदाक्रांताजलधिषडगैर्म्भौनतौताद्‍गुरु चेत्‍ ) : -
मंदाक्रान्ता मभनततगागानिं ती होय जाणा ।
मृद्‍वंगी भ्रू मदनधनु तें चालतें नागरीती ।
शब्दी सारी लगुकुचवती कांति हेमा हरी ती ॥
पाजोनी वैकृतरस मुनी जिंकिले भिक्षु जीनें ।
मदाक्रांता प्रथम सुरतीं राधिका कृष्णजीनें ॥१३२॥
मोठी शोभा म्हणुनि जरि तूं पाहतोसी स्वहेहा ।
भूषावस्त्रद्रविणतनुजस्त्रीसहायादि देहा ॥
लाभस्थानीं दिविंचर तया सत्फलें सर्व होती ।
मंदाक्रांती तनु असलिया ता विनाशास जातीं ॥१३३॥
==
शिखरिणी: -
( रसै रुद्रैश्छिन्ना यमनसभलाग: शिखरिणी ) : -
गुरु अन्तीं आणि यमनसभलांनीं शिखरिणी ।
यशानें मा तैशा निघति सकव्ला भाव धरुनी ।
सदन्नें अर्पाया व्दिजयुवति देवास करुनी ॥
करीं पात्रें पंक्तीमधुनि फिरती जेविं करिणा ।
दधिक्षिराज्यान्नें म्हणति हरि घे ही शिखरिणी ॥१३४॥
यशस्वी मांसें ही नयनसुखदे भ्रातृजननी ।
गुरुहस्त्यश्वासृक्‍ शुभ शकुन हें दुष्ट अधनी ॥
खळास्थी धूम्राग्री शरटभुजगव्याघ्रहरिणी ।
यती लिंगी शत्रू मलिन विधवा वैशिख रिणी ॥१३५॥
यतीतें मानेना नय न समजे भाग्यहि नसे ।
बहू भक्षी विद्या न करुनि उगा जो फिरतसे ।
बरी निद्रा घेतो न शुभ अवडे पूर्वजरिणी ।
समा योषा होते समयिं करिणी त्या शिखरिणी ॥१३६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP