काही कोळी नदीत जाळी टाकून मासे धरीत असता, नदीकाठच्या एका झाडावर बसून एक माकड ती मजा पाहात होते. काही वेळाने पाण्यात जाळी घालून ते कोळी जेवणासाठी आपल्या घरी निघून गेले. तेव्हा आपणही कोळ्यासारखे जाळी टाकून मासे धरावे या हेतूने ते माकड पाण्यात उतरले व जाळी काढण्याचा प्रयत्न करू लागले. पण जाळे कसे काढावे हे त्याला माहीत नसल्याने उलट तो स्वतःच जाळ्यात अडकला व त्याच्या नाकातोंडात पाणी शिरल्यामुळे गुदमरू लागला. मग जाळ्यातून सुटण्याची धडपड करत असता तो आपल्याशीच म्हणाला, 'मी किती मूर्ख ! ज्या गोष्टीशी मला काही कर्तव्य नाही, त्या गोष्टीच्या उठाठेवीत मी पडलो त्याचा हा परिणाम.'
तात्पर्य - ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही तिच्या वाटेस जाऊ नये.