एका शेतकर्याच्या शेतात शिरून कोल्ह्यांनी फार धुमाकूळ घातला होता. म्हणून त्यांना पकडण्यासाठी शेतकर्याने शेतात एक चाप लावून ठेवला. दुसरे दिवशी सकाळी त्या चापात एक कोल्हा अडकलेला त्याने पाहिला. मग रागाने त्याने त्या कोल्ह्याला शेपटाला तेलाने भिजवलेली फडकी गुंडाळून त्याला आग लावली व सोडून दिले. आगीमुळे होरपळून निघणारा तो कोल्हा धान्याने भरलेल्या एका मोठ्या शेतात शिरला व त्याच्या शेपटाची आग लागून ते सगळे धान्य थोड्याच वेळात जळून गेले. गे नुकसान करून घेतले हे लक्षात आल्यावर शेतकर्याला फार पश्चात्ताप झाला.
तात्पर्य - रागाच्या भरात आपण जे काय करतो, त्याचा परिणाम काय होईल याचा विचार माणसाने अवश्य केला पाहिजे.