काही उंदीर आपल्या बिळातून बाहेर डोकावीत असता एका फळीवर बसलेले एक मांजर त्यांनी पाहिले. ते मांजर इतके शांत बसले होते की, ते अगदे निरुपद्रवी दिसत होते. त्याला पाहून एक उंदीर आपल्याशीच म्हणाला, 'तो एक चांगल्या स्वभावाचा प्राणी बसला आहे अन् त्याचा चांगुलपणा त्याच्या चेहर्यावर स्पष्ट दिसतो आहे, त्याच्याशी आपली ओळख करून घ्यावी असे मला वाटते.' इतके बोलून आपल्या मित्राकडे लक्ष न देता तो एकदम निघाला व त्या मांजराजवळ गेला. तो आपल्या पंजाच्या आटोक्यात येताच मांजराने त्याची खात्री करून दिली की, 'चेहर्यावरून स्वभावाची परीक्षा करणे सुरक्षितपणाचे नाही.