एकदा एक बोकड इतका मस्त झाला की, 'त्याने सर्व बोकडांशी लढून त्यांचा पराभव केला. मग त्याला वाटले की, आता बैलाशी झुंजून त्याचाही पराभव करावा. त्याप्रमाणे त्याने ऐका बैलास लढण्यास आव्हान केल्यावर त्याची व त्या बैलाची लढाई जुंपली व थोड्याच वेळात बैलाने त्याला चांगला मार देऊन त्याची हाडे खिळखिळी करून टाकली. काही वेळाने सावध झाल्यावर बोकड आपल्याशीच म्हणाला, 'मला शिक्षा मिळाली हे योग्यच झालं. जो आपल्यापेक्षा शक्तीनं मुळचाच श्रेष्ठ त्याच्याशी स्पर्धा करण्याचा परिणाम असाच व्हायचा.'