धावे, पावे, यावे लंबोदरा ॥
गजानन मोरेश्वरा ॥धृ०॥
वामाकांवरी ब्रह्मकुमारी ॥
दक्षिणेसी शारदा नारी ॥
ऋद्धी सिद्धी वसती शेजारी ॥
मस्तकी दूर्वांकुर ॥ शोभती ० ॥धावे०॥१॥
सर्वांगी शेंदूर चंदनाची उटी ॥
पिवळा पीतांबर सुमनाची दाटी ॥
दक्षिण करि घेशी मोदकांची वाटी ॥
बैससी मूषकावर ॥
मोरया तू बैससी मूषकावर ॥धावे०॥२॥
हे मन रमले गजानन पायी ॥
पदि लीन झाली ही कृष्णाबाई ॥
गौरिकुमारा मति मज देई ॥
करि साह्य निरंतर ॥धावे०॥३॥